मुस्लिम समाजाची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने, डॉ.प्रियंका रेड्डी बलात्काराचा निषेध

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – डॉ.प्रियंका रेड्डी या युवतीवर सामुदायिक बलात्कार करुन तीची हत्या केल्याचा मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन निषेध नोंदविण्यात आला. तर आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देण्यात आले.

यावेळी साहेबान जहागीरदार, नगरसेवक समद खान, सय्यद शफी बाबा, उबेद शेख, नईम सरदार, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, अंजूम इनामदार, वहाब सय्यद, तन्वीर भाई, आमीर सय्यद, आबिद दुल्हेखान, नासिर खान, मुसद्दीक मेमन, वाहिद शेख, भैय्या बॉक्सर, फैसिम शेख, आसिम शेख, मोहसीन शेख, फैद शेख आदींसह मुस्लिम समाजबांधव व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हैदराबाद येथील पशू वैद्य चिकीत्सक डॉ.प्रियंका रेड्डी या युवतीवर काही नराधमांनी सामुदायिक बलात्कार करुन तिची हत्या केली. तर सदर युवतीच्या प्रेतास जाळण्यात आले. घडलेला हा प्रकार संपुर्ण मानव जातीस काळिमा फासणारा आहे. आजही महिला व मुली सुरक्षित नसल्याचे या घटनेवरुन अधोरेखित होत आहे. निर्भया नंतर असे प्रकार सातत्याने घडत असून, महिलांवर बलात्कार करणार्‍या नराधमांचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

तसेच शहरासह जिल्ह्यात देखील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न भेडसावत असून, अनेक ठिकाणी महिलांची छेडछाडचे प्रकरण समोर येत आहे. अशा घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यात होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने महिलांच्या सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलण्यात यावे. तसेच अहमदनगर प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करुन सामाजिक उपक्रमाद्वारे जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

Visit : Policenama.com