दौंड : मुस्लिम समाजाचा निर्धार… फिर एक बार ‛राहुल दादाच आमदार’ (व्हिडिओ)

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – दौंड तालुक्यातील मुस्लिम समाजाला निधी देताना राहुल कुल यांनी कधी जात पाहिली नाही त्यामुळे आम्ही सुद्धा राहुल दादा हे कोणत्या पक्षातून उभे आहेत हे न पाहता फक्त दादा उभे आहेत हेच पाहणार असून आमच्या संपूर्ण समाजाचा आमदार राहुल कुल यांनाच पाठिंबा असून त्यांनाच निवडून आणू निर्धार दौंड तालुक्यातील मुस्लिम समाजाने केला आहे.

दौंड तालुक्यातील विविध गावांमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार राहुल कुल यांना यावेळी जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. शहरातील एक दोन व्यक्ती म्हणजे पूर्ण समाज नाही त्यामुळे स्वतःला मुस्लिम नेते म्हणवणाऱ्यांनी तालुक्यातील मुस्लिम समाजाला गृहीत धरू नये असा इशाराही यावेळी मुस्लिमांकडून देण्यात आला आहे. याबाबत दौंड तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या भावना जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी अब्बास शेख यांनी.

Visit : Policenama.com 

You might also like