वचनपुर्ती ! ‘या’ मुस्लिम दाम्पत्याकडून ‘कॅन्सर’ पिडीत मित्रावर ‘हिंदू’ विधीनुसार ‘अंत्यसंस्कार’, ‘श्राध्द’ही घालणार

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील आसनसोलच्या सीतारामपुरमध्ये मानवतेचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. येथील एका मुस्लिम दाम्पत्याने आपल्या जवळील हिंदू व्यक्तीला दिलेल्या वाचनाची परतफेड करत हिंदू रीती रिवाजानुसार त्याचे अंतिम संस्कार केले. जात आणि धर्माच्या वर जाऊन त्यांनी हे काम केल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर त्यांनी असे करून जगासमोर फार मोठे उदाहरण सादर केले आहे.

कॅन्सर पीडित होता व्यक्ती

सीतारामपुरमध्ये राहणाऱ्या सुरेंद्र भगत अग्रवाल यांनी आपल्या शेजारी राहणाऱ्या सईद खान आणि रेशमा खान या मुस्लिम दाम्पत्याजवळ आपल्या मृत्यूनंतर आपले अंतिम संस्कार हिंदू रीती रिवाजानुसार करण्यात यावेत. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर या भागातच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम संस्कारांबरोबरच त्यांचे श्राद्ध देखील घालण्यात येणार आहे.

मुंबईत झाली मैत्री

सीतारामपुरमधील रेश्मा यांनी ३० वर्ष आधी कोलकात्यामधील सईद यांच्याशी विवाह केला होता. त्यानंतर ते मुंबईला गेले. मात्र मूल नसलेल्या या दाम्पत्याला सुरेंद्र यांनी चांगलेच जीव लागले. सुरेंद्र हे रेश्मा यांना आपली मुलगी मानत होते. सुरेंद्र यांना आजार जडल्यानंतर या दाम्पत्याने त्यांची मोठ्या प्रमाणात सेवा केली. त्यांना तोंडाचा कॅन्सर होता. त्यानंतर त्यांना घरी नेऊन देखील त्यांची सेवा केली.

गुरुवारी घेतला अंतिम श्वास

एक महिन्यापूर्वी त्यांची तब्येत खालावल्यानंतर त्यांनी जवळपास सर्वच कृती बंद केली होती. त्यांना एका नळीवाटे अन्न दिले जात असे. शेवटी गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

आरोग्यविषयक वृत्त –