‘या’ मुस्लिम कुटुंबानं 121 वर्षांपासून जपून ठेवलीय उर्दू भाषेतील श्रीमद् भगवद्गीता !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका मुस्लिम कुटुंबाने उर्दू भाषेत लिहिलेली श्रीमद् भगवत गीता 121 वर्षांपासून सांभाळून ठेवली आहे. मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील जावरामधील हे मुस्लिम कुटुंब आहे. या कुटुंबातील 3 पिढ्यांनी कुरआन शरीफप्रमाणे याची काळजी घेतली आहे. ही भगवद्गीता कॉन्ट्रॅक्टर अनीस अनवर(57) यांच्या संग्रहात आहे. त्यांना जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते या गीतेचे वाचन करतात आणि गीता त्यांना आयुष्यातील मार्गही दाखवते. या पुस्तकाचा अनुवाद 1898 मध्ये संस्कृतमधून उर्दूमध्ये करण्यात आला आहे.

121 वर्षांपूर्वी गीतेचे संस्कृतमधून उर्दूमध्ये अनुवाद करण्यामागे मुस्लिम वर्गाला गीतेबद्दल माहिती मिळावी हा हेतू होता. मथुराचे पंडित जानकीनाथ मदन देहलवी यांनी 1898 मध्ये संस्कृतमधील गीतेचा उर्दूमध्ये अनुवाद केला. पंडित रामनारायण भार्गव यांच्या मार्फत मथुरा प्रेसमधून हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. या ग्रंथात गीतेमधील पाठ, महत्त्वपूर्ण श्लोक उर्दू आणि पारशी भाषेत अनुवाद केले.

गीतेची किंमत होती अवघे 6 पैसे

उर्दूमध्ये अनुवाद केलेल्या गीतीचे प्रकाशन 15 मार्च 1898 रोजी करण्यात आले होते. त्यावेळी या गीतेची किंमत 6 पैसे होती. यात एकूण 230 पानं असून यात 18 अध्याय आहेत. अनीस अनवर सांगतात की, कुरआन शरीफप्रमाणे इतर धर्म ग्रंथही ते एकत्र ठेवतात.

सुख-दु:खांचे गीतेतून खोलवर दर्शन

अनीस अनवर म्हणातात, “या गीतेत पान नंबर 41 वर “यं हि नव्यथयंत्येते पुरुषं पुरुषर्षभ। संदु:ख सुखंधीरं सौअमृतत्वायकल्पते।।” हा श्लोक आहे. या श्लोकाने मी खूप जास्त प्रभावित आहे. या श्लोकाचा अर्थ आहे की, ज्या माणसाला कोणत्याही परिस्थितीनं काही फरक पडत नाही. जो सुख आणि दु:खात एकसारखाच राहतो, तो अमर होतो.” अनीस त्यांचेच कुटुंबमित्र किशोर शाकल्यसोबत याचे पठण करतात.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like