….. तर मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न करावे : साध्वी प्राची

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम प्रकाशझोतात असणाऱ्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. साध्वी प्राची यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत साध्वी प्राची यांनी मुस्लिम महिलांना हिंदू मुलांशी लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’985469db-9657-11e8-b950-ab55b7994214′]

साध्वी प्राची यांना विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणतात, मुस्लिम धर्मात पती तलाक देणार नंतर सासरा हलाला करणार हे अमानवीय असून जे मौलवी मुस्लिम महिलांसाठी हलालाचा फतवा काढतात त्यांच्या कानशिलात लावली पाहिजे. तसेच नाही तर जे मौलवी हलालाचे समर्थन करतात त्यांना शिक्षा झाली पाहिजे, ज्या धर्मात महिलांची इज्जत केली जात नाही, जिथे नरकासारखे जीवन जगावे लागते त्या धर्मात महिलांनी राहू नये. ज्या महिला हिंदू धर्मात येतील त्यांचे मी स्वागत करेल. हालालापासून वाचायचे असेल तर हिंदू मुलांशी लग्न करावे असे वक्तव्य साध्वी प्राची यांनी केले आहे.