अयोध्या : भूमीपूजनाबद्दल मुस्लिम नेत्यानं दिली धमकी, म्हणाले – ‘मंदिर तोडून बनवणार मस्जिद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्या येथील राम मंदिर भूमिपूजनाच्या एक दिवसानंतर अखिल भारतीय इमाम असोसिएशनच्या अध्यक्षांनी वादग्रस्त विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन आणि पायाभरणी केल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद साजिद राशीदी यांनी मंदिर पाडण्याची धमकी दिली आहे. राम मंदिर तोडून तेथे मशिद तयार केली जाईल, असे राशीदी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, वादग्रस्त जागेवर मंदिर कधीच नव्हते. तेथे बाबरी मशीद होती आणि तिथेच राहील.

एका वृत्तसंस्थेनुसार, मोहम्मद साजिद राशीदी यांचे हे विधान ट्विट केले आहे. वृत्तानुसार राशीदी म्हणाले, ‘इस्लाम म्हणतो की एक मशिद नेहमीच एक मशिद असेल. ती काही वेगळे बांधण्यासाठी तोडली जाऊ शकत नाही. आमचा विश्वास आहे की, ती एक मशिद होती आणि नेहमीच मशिद राहील. मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधली गेली नव्हती, पण आता मशिद बांधण्यासाठी मंदिर पाडले जाऊ शकते.’

वास्तविक अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या अगोदर अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने (एआयएमपीएलबी) एका वादग्रस्त ट्विटमध्ये म्हटले होते की, बाबरी मशिद नेहमी होती आणि कायमच राहील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्न विचारत मंडळाने म्हटले की, हा निर्णय अन्यायकारक, अत्याचारी, लज्जास्पद आहे. बहुसंख्य तुष्टीकरणाच्या आधारे या जागेचे पुन्हा निर्धारण केले गेले होते.

त्याचबरोबर अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुसलमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही असेच ट्विट केले. ओवैसी यांनी बाबरी मशिद आणि तिच्या विध्वंसाचे एक-एक चित्र शेअर करत म्हटले- ‘बाबरी मशिद होती आणि राहील. ईशानल्लाह.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भूमिपूजनानंतर राम मंदिराची पायाभरणी केली. राम मंदिराच्या पायाभरणी समारंभाचा शुभ मुहूर्त ३२ सेकंदाचा होता. १२:४४ मिनिटे ८ सेकंदांपासून ते १२:४४ मिनिटे ४० सेकंदांपर्यंत चालला. पायाभरणी झाल्यानंतर मोदींनी देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले की, रामलल्ला वर्षानुवर्षे तंबूमध्ये राहिले. आता लवकरच एक भव्य मंदिर बांधले जाईल. राम मंदिर भारतीय संस्कृतीचे आधुनिक प्रतीकही बनेल. आपण परस्पर प्रेम आणि बंधुतेच्या संदेशासह राम मंदिराची पायाभरणी केली पाहिजे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like