मुस्लिम महिलेने स्वतःच नाव ‘गीता’ असल्याचं सांगुन केलं पुजार्‍याशी लग्‍न, पुढं झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशमधील राजगढ जिल्ह्यामध्ये एका लुटेरी दुल्हनने एका हिंदू पुजाऱ्याला फसवल्याची घटना समोर आली आहे. विवाहित मुस्लिम महिलेने या पुजाऱ्याला आपण हिंदू असल्याचे सांगत त्याच्याबरोबर लग्न केले. मात्र दुसऱ्या दिवशी ती पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तिला अटक केली. राजगढ जिल्ह्यातील गादिया कला गावातील हि घटना असून एका दलालाने या पुजाऱ्याकडून सव्वा लाख रुपये घेऊन एका मुस्लिम विवाहित महिलेला हिंदू असल्याचे सांगत त्याच्याबरोबर लग्न लावून दिले.

लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हि महिला पळून जाण्याच्या तयारीत असताना नागरिकांनी तिला पकडले. त्यानंतर तिने हंगामा करत नागरिकांशी वाद घातला. या घटनेशी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या महिलेला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गावातील पुजारी अशोक हा अनेक दिवसांपासून लग्नासाठी मुलगी शोधत होता. याचाच फायदा घेत नारायण नावाच्या दलालाने सव्वा लाख रुपयात त्याचे लग्न करून देण्याचे काबुल केले. त्याने सुरुवातीला या मुस्लिम महिलेचे नाव गीता असे सांगत अशोकची फसवणूक केली. त्यानंतर त्याने गावातील मंदिरात या दोघांचे लग्न लावून दिले. त्यानंतर कोर्टात लग्न लावून देण्याचे आश्वासन देऊन सव्वा लाख रुपये घेऊन पसार झाला.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या या महिलेला पोलिसांनी अटक केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. महिलेने पोलिसांना सर्व खरी घटना सांगितली. तिने पोलिसांना सांगितले कि, ती विवाहित असून तिचे नाव हिना असे आहे. महिला मध्यप्रदेशमधील छिंदवाडाची रहिवासी असून पोलीस पुढील तपास करत असून दलाल नारायण सिंग हा फरार आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like