मुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म बदलला

यमुनानगर : पोलीसनामा ऑनलाइन –   एका मुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म बदलला होता. त्यानंतर त्याने मुलीच्या कुटुंबीयांपासून आपल्या व पत्नीच्या जिवाला धोका असल्याचे न्यायालयात सांगितले. या प्रकरणाची दखल घेत पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने दोघांना संरक्षण देण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

यमुनानगर पोलीस अधीक्षक कमलदीप मंगळवारी बोलताना म्हणाले, येथील १९ वर्षीय तरुणीने व २१ वर्षीय तरुणाने ९ नोव्हेंबरला हिंदू पद्धतीने विवाह केला. विवाहानंतर तरुणाने आपल्या नावात बदल केला. त्यानंतर तरुणाने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत आपल्याला मुलीच्या कुटुंबीयांपासून जिवाला आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याला धोका असल्याचे सांगितले. आपल्या विवाहास विरोध दर्शवणे म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत प्राप्त झालेल्या अधिकारांचे उल्लंघन असल्याचे दांपत्याने न्यायालयासमोर म्हटले.

दरम्यान, पोलिसांनी न्यायालयाचे निर्देश मानत या दांपत्याला सुरक्षा प्रदान केली आहे. मागील काही दिवसांपासून हे दांपत्य यमुनानगरच्या सुरक्षागृहात राहत आहेत. पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांना समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हे दोघे विवाहित असून, त्यांना आता दोघांच्या इच्छेनुसार सोबत राहता आले पाहिजे, असे मुलीच्या कुटुंबीयांना सांगितल्याचे पोलीस अधीक्षकांनी माहिती देताना म्हटले.

तथापि, काही दिवसांपूर्वीच हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी राज्य सरकारने ‘लव्ह जिहाद’ विरोधात (Love Jihad) कायदा तयार करण्यासाठी तीन सदस्यीय समितीचे गठन केल्याचे म्हणाले. विवाहासाठी धर्मांतर केल्यास भाजप नेते त्यास ‘लव्ह जिहाद’ असे म्हणतात