धक्कादायक ! भगवद्गीता वाचणाऱ्याला ‘मुस्लिम’ तरुणांकडून बेदम मारहाण

आग्रा : वृत्तसंस्था – भगवद्गीता वाचणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला अलिगढमध्ये घरात घुसून मारहाण करण्यात आली. मुस्लिम समाजाच्याच तरुणांनी ही मारहाण केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दुसऱ्या धर्माविषयी आदर दाखविणाऱ्यांना कट्टरपंथीयांकडून मारहाण होण्याच्या घटना गेल्या काही महिन्यात वाढू लागल्या आहेत.

पश्चिम बंगालमधील खासदार नुसरत जहाँ यांनी खासदार म्हणून संसदेत शपथ घेताना गळ्यात मंगळसुत्र, कपाळाला कुंकू लावले होते. यावरुन मुस्लिम समाजातून त्यांच्यावर टिका झाली होती. त्यात आता केवळ हिंदुचा धार्मिक ग्रंथ वाचतो, म्हणून एखाद्याला मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५५ वर्षांचे दिलशेर हे एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. कामावरुन ते गुरुवारी सकाळी घरी परत आले. त्यानंतर त्यांनी भगवद्गीता वाचण्यास सुरुवात केली. त्यावेळी समीर, झाकीर आणि काही तरुण दिलशेर यांच्या घरात घुसले आणि त्यांनी दिलशेर यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरातील गीता, रामायण आणि हिंदु धर्माशी संबंधित ग्रंथ घेऊन गेले.

याबाबत दिलशेर यांनी सांगितले की, मी गेल्या ३८ वर्षांपासून धार्मिक ग्रंथ वाचत आहे. मी मुस्लिम असलो तरी मला माझा धर्म इतर धर्मांची पवित्र ग्रंथ वाचण्यापासून कोणी रोखू शकत नाही.

पोलिसांनी समीर, झाकीर व इतरांवर धार्मिक भावनांना धक्का पोहचविणे, मारहाण, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा