भाजप नेत्यास उदंड आयुष्य लाभावे म्हणून मुस्लिम तरुणांचा महादेवाला ‘अभिषेक’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – देशात व महाराष्ट्र राज्यात माॅॅब लाॅन्चिंग सुरू आहेत. परवा औरंगाबाद पर्यंत जय श्रीराम नारे घेण्यासाठी मुस्लिम तरुणास कुठल्यातरी अधर्मीय लोकांनी बेदम मारहाण केली होती. त्याचे पडसाद अनेक भागात सुरूच आहेत. पण नांदेड जिल्ह्यातील अनेक मुस्लिम तरुणांनी भाजप प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या नेत्यासाठी चक्क महादेवाला अभिषेक करून धर्मां-धर्मांत असलेला जातीचा पगडा दूर केला आहे. ह्या तरुणांचे जिल्हा भर कौतुक होत आहे.

कंधार तालुक्यातील बारुळ येथील बबलू शेख बारुळकर यांच्या आयोजनातून भाजप प्रदेशउपाध्यक्ष तथा मा.खा. भास्करराव पाटील खतगावकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
सकाळी ९ वाजता बारुळ येथील जागृत देवस्थान महादेव मंदिर येथे माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांना उदंड आयुष्य लाभावे यासाठी महापूजा करण्यात आली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बारुळ येथे रूग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच खतगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कंधार-लोहा मतदार संघात २५०० झाडे लावण्याचा शेख यांनी संकल्प करत वृक्षारोपण बारुळ येथून सुरुवात करण्यात आली. बारुळ येथील आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले. अशा अनेक उपक्रमांनी बारुळ येथे भाजप प्रदेशउपाध्यक्ष तथा मा.खा. भास्करराव पाटील खतगावकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला आयोजक बबलू शेख बारुळकर सह प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.मुनेश्वर, डॉ.सूर्यवंशी, रावसाहेब नाईक (से.स.सो.चेअरमन बारुळ), हैदर पठाण, सुलतान शेख, हुलाजी वखरडे, सामाजिक वनीकरणचे नारायण टोकलवड, शबीर शेख, शाहरूख पठाण, ए. एल.नरवाडे, डी. के.बोधगिरे, ए. एम.शिखरे, बी बी पांडागळे, अलवादीन शेख, सलीम शेख सह आदीजन उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like