आरएसएसमुळे भारतात ख्रिश्चन, मुस्लिम असुरक्षित : पाकिस्तान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

संयुक्त राष्ट्र संघाच्या ७३ व्या आमसभेत भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्यांवरून पाकिस्तानला सुनावले. मात्र, स्वराज यांच्या भाषणानंतर भारताला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली. आरएसएस हे आमच्या भागात दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. ते एक हुकूमशाहीचे केंद्र आहे. भारतात  ख्रिश्चन आणि मुस्लीम अल्पसंख्यक असुरक्षित आहेत, असे पाकिस्तानच्या राजदुतांनी म्हटले.

दहशतवादावरून सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत पाकिस्तानचे राजदूत साद वराईच म्हणाले, आरएसएस हे आमच्या भागात दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. ते एक हुकूमशाहीचे केंद्र आहे. भारतात ख्रिश्चन आणि मुस्लीम अल्पसंख्यक असुरक्षित आहेत. तेथे हिंदुत्ववादी योगी आदित्यनाथ एका मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते उघडपणे केवळ हिंदूच श्रेष्ठ असल्याचे बोलतात. तसेच संघाच्या शाखांमध्ये फॅसिझम शिकविले जाते. ज्या देशात मशिदी आणि चर्च जाळली जातात त्यांना दुसऱ्यांना बोलण्याचा आधिकार नाही, असे साद म्हणाले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’80c4e74a-c530-11e8-8f37-7986184052fb’]

भारताने दहशतवादाला शह देण्याच्या मुद्याहून संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठाहून पाकिस्तानला फटकारले होते. यावेळी स्वराज यांनी दोन्ही देशांतील चर्चा निष्फळ ठरण्यास इस्लामाबादच जबाबदार असल्याचे म्हटले होते. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले होते की, पाकिस्तानने पंतप्रधान मोदींना भेटीचे निमंत्रण दिले होते. मात्र, पाकिस्तानची भावना चांगली नाही. भेटीच्या निमंत्रणाच्या काही वेळानंतरच त्यांनी आमच्या सैनिकांची अमानुष हत्या केली. त्यामुळे, अशा दहशतवादी पाकिस्तानशी चर्चा कशी करावी? असा सवाल स्वराज यांनी केला होता. पाकिस्तान दहशतवाद्यांचे माहेर घर आहे. दहशतवादाच्या विरोधात जागतिक स्तरावर मजबूत कायद्याची गरज आहे, असे सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने आरएसएस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टार्गेट करत त्यांच्यावर दहशतवादाचा आरोप केला आहे.

माझ्याबद्दल अपशब्द काढा पण, सरदार पटेल यांच्याबाबत भाष्य नको : मोदी

राज्य सरकार संभाजी भिडेंसह ४१ राजकीय नेत्यांवर ‘मेहरबान’

[amazon_link asins=’B0784D7NFX,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2f91c8a8-c532-11e8-9b06-cdd97aa8ab9d’]

जाहीरात