मुस्लिम बांधवाच्या वतीने पुरग्रस्तांना आर्थिक मदत

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – सोमवारी जिल्हाभरात (ईद-उल-अज्हा) बकरी ईद उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी सामुदायिक नमाज अदा करण्यात आली. जिल्हा भरात ईदची नमाज अदा केल्यानंतर खुदबा पठन करण्यात आला. दुवा झाल्यानंतर सांगली, कोल्हापुर, सातारा जिल्हयातील पुरग्रस्तांना आर्थिक मदत करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्हा भरात ईदची नमाज अदा झाल्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. पुरग्रस्तांना आर्थिक मदत करावी यासाठी करण्यात आलेल्या आवाहनाला परभणी, पाथरी, जिंतूर, पुर्णा या तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला.

पुरग्रस्तांना पाथरी येथुन एक लाख आठ हजार रुपये, तर जिंतूर येथुन एक लाख रुपये, पुर्णा येथुन सदतीस हजार पाचशे रुपये अशी मदत जमा करण्यात आली. पाथरी येथे जमा रक्कमेचा डीडी परभणीचे जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांना सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी मौलाना कमरोदीन नदवी, मौलाना अल्ताफ नदवी, मौलाना शाहमीर, मौलाना हाफिज नबार, मौलाना हाफिज अली, मौलाना हाफिज इलियास, मौलाना हाफिज असलम, मौलाना हाफिज अजगर आदींसह इतरांनी जिल्हाधिकारी यांना डीडी सुपुर्द केला

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like