…तर मुस्लिमांनी भाजप सोबत राहावे, काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आल्यानंतर कर्नाटक काँग्रेसमधील नेते रोशन बेग यांनी सोमवारी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी बेग यांनी मुस्लिमांना एक संदेश दिला असून मुस्लिमांनी भाजपमध्ये सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर देखील जोरदार टीका केली.

देशात एनडीए पुन्हा एकदा सत्तेत आल्यास मुस्लीम बांधवांनी भाजपशी जुळवून घ्यावे ही नम्रतेचे आवाहन मी करतो, असंही बेग म्हणाले. तर गरज भासल्यास मुस्लिमांनी भाजपमध्ये सामील व्हावे, असंही त्यांनी सांगितले. कर्नाटक राज्यात काँग्रेसने केवळ एका मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी दिल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. कर्नाटकमध्ये काँग्रेसने मुस्लिमांना न्याय दिला नाही. तसेच आपण येणाऱ्या काळात काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेऊ असंही त्यांनी म्हंटले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीएला बहुमत मिळेल असं सांगण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. तर काहींनी एक्झिट पोलच्या विरुद्ध निवडणुकीचा निकाल लागले असे सांगितले आहे.

Loading...
You might also like