मशिदी समोर मुस्लीम बांधवांकडून बाप्पांवर फुलांचा वर्षाव

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन

भिवंडी शहरात गणपती विसर्जन मिरवणूकीदरम्यान दरगाहरोड हिंदुस्थानी मशिदीजवळ मुस्लिम बांधव व शांतता समिती व पोलीसांनी फुलांचा वर्षाव करुन गणरायाला भावपूर्व निरोप दिला. जातीय सलोख्याची परंपरा मागील १५ वर्षापसून सुरु आहे. या विसर्जन मिरवणूकीदरम्यान मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून गणेशोत्सव मंडळाचे स्वागत करत होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’36c12e15-bfac-11e8-9291-1f6f6a08def9′]

भिवंडी शहरात विविध भागातून निघणाऱ्या सार्वजनिक बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गात तब्बल अकरा मशिदी येत असून हिंदुस्थान मशिदी समोरच दिवाणशाह सेवा संस्थेचेच्या वतीने मुस्लिम बांधव बाप्पांवर फुलांचा वर्षाव करतात. यावेळी भिवंडीतील दरगाहरोड हिंदुस्थानी मशिदचे पदाधिकारी, मुस्लीम बांधव व शांतता समिती सदस्य आणि पोलीस यांच्यावतीने गुलाब पुष्प व पाकळया उधळून गणेशोत्सव मंडळाचे स्वागत करण्यात आले. गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने शिवाजीचौक येथे स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. पालिका प्रशासनाने कामवारी नदीचा टिळक घाट, शेलार नदीनाका, वराळदेवी तलाव येथे मोठमोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी खास तराफ्यांची व्यवस्था केल्याने गणेश भक्तांनी बाप्पांचे सुरळीतपणे विसर्जन करता आले. महापौर जावेद दळवी, खा. कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, आ.रूपेश म्हात्रे आदी मान्यवरांनी गणेश मंडळाचे विविध ठिकाणी स्वागत कक्षात स्वागत करीत आहे.

रिमोट कारमधील गणपतीची विसर्जन मिरवणूक ठरली लक्षवेधी

पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात ठीक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले होते. भिवंडी परिसरातील सार्वजनिक २६१ व घरगुती ११ हजार २३० गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. भिवंडी शहरासह ग्रामीण भागातील गणेश भक्तांनी नारपोली, कारिवली तलाव, टिळक घाट, नदीनाका, भादवड, वराळदेवी तलाव, खोणी गाव, कोनगाव, टेंभवली, जू-नांदुर्खी, अंजूर, दिवे, माणकोली, पिंपळास, दापोडे, खारबाव रेती बंदर, काल्हेर रेती बंदर, अंबाडी, पहारे, वज्रेश्वरी, गणेशपरी, अकलोली कुंड, दुगाड, दाभाड, खंबाळा आदी  परिसरातील  गणपती  बाप्पाचे  तलाव, नदी, ओढे, नाल्यांच्या डोहांमध्ये भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने गणपती बाप्पाना विसर्जन केले.

[amazon_link asins=’B01LY2TN7G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6fbf37eb-bfad-11e8-ab6d-af9ca07ba35d’]

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like