मोदी सरकारनं नववर्षात केली ATM संदर्भात मोठी ‘घोषणा’, एकदम ‘फ्री’ मिळतील 10 लाख, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने एटीएम संबंधित दोन महत्वाच्या घोषणा नव्या वर्षांमध्ये केल्या आहेत. नवीन वर्षीच्या मुहूर्तावर सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा देत रूपे कार्ड आणि युपीआय ट्रांजॅक्शनवर MDR चार्ज (मर्चेंट डिस्काउंट रेट) ला काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे आता एमडीआर शुल्क खर्च झाल्यानंतर ट्रांजॅक्शनच्या वेळी कोणताही अतिरिक्त शुल्क द्यावा लागणार नाही. तसेच अडचणीच्या काळात हे कार्ड तुम्हाला दहा लाखांपर्यंतची मदत करू शकणार आहे.

सरकारने केल्या मोठ्या घोषणा
सरकारने रूपे कार्डबाबत मोठी घोषणा केली आहे. एमडीआर शुल्क आणि यूपीआय व्यवहार शुल्क रद्द करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयानंतर रुपे कार्ड व यूपीआय व्यवहारांवर आणखी एमडीआर शुल्क आकारले जाणार नाही. ही फी ग्राहकांकडू न आकारता सरकारने स्वत: भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. जेव्हा जेव्हा ग्राहक खरेदी करताना मशीनमध्ये आपले कार्ड स्वॅप करतो तेव्हा दुकानदारास प्रत्येक व्यवहारावर निश्चित रक्कम भरावी लागते, ज्यास एमडीआर शुल्क असे म्हणतात. हा शुल्क आता बंद करण्यात आलेला आहे.

अडचणीच्या काळात मिळणार 10 लाख रुपए
रूपे सिलेक्ट क्रेडिट कार्ड सोबत दहा लाख रुपयांचा इंशुरन्स देखील मिळणार आहे. SBI आणि PNB सहित सर्व प्रमुख सरकारी बँक हे कार्ड देतात. त्यातच एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक सहित जास्त तर खाजगी बँक हे कार्ड सुरु करत आहेत. सरकारने आता या कार्ड सोबत दहा लाखांचा अपघाती विमा देण्याचा निर्णय घेतला आहे.

एखादा अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आढळल्यास विमा संरक्षण मिळते. रुपे कार्डच्या क्लासिक कार्डवर एक लाख रुपयांपर्यंतचा विमा आणि प्रीमियम कार्डांवर 10 लाखांपर्यंतचा विमा उपलब्ध आहे. त्याचबरोबर रुपे कार्डवर 16000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक उपलब्ध आहे. संयुक्त अरब अमिरात (युएई), सिंगापूर, श्रीलंका, यूके, यूएसए, स्पेन, स्वित्झर्लंड आणि थायलंडवर रुपे कार्ड वापरण्यासाठी मासिक 16000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक उपलब्ध आहे.

16 हजारांचा कॅशबॅक
आंतरराष्ट्रीय कार्डधारकांना रुपे ने 16000 रुपयांपर्यंतच्या कॅशबॅकची ऑफर दिली आहे, मात्र ही ऑफर निवडक देशांतील व्यवहारावरच वैध असेल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) सांगितले की युएई, सिंगापूर, श्रीलंका, यूके, यूएसए, स्पेन, स्वित्झर्लंड आणि थायलंडमधील रुपे कार्डधारकांना या कार्डद्वारे पेमेंट केल्यास त्यांना 16 हजारांपर्यतचा कॅशबॅक मिळू शकतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/