सलग 6 दिवस बँका बंद राहणार, ATM मध्ये होणार ‘खडखडाट’, ‘होळी’मध्ये भासू शकते ‘कॅश’ची कमतरता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मार्च महिन्यात होळी आहे. या दरम्यान तुमच्याकडे रोख पैसे नसल्यास ती बँकेतून किंवा एटीएममधून काढून आणा. कारण बँका सलग 6 दिवस बंद असणार आहेत. त्यामुळे एटीएममध्ये देखील पैशांची चणचण भासू शकते. त्यामुळे बँका सुट्ट्यांवर जाण्यापूर्वीच तुम्ही तुमची कामे पूर्ण करुन घ्यावीत. अन्यथा सणासुदीला तुम्हाला पैशांची चणचण भासू शकेल.

मार्चमध्ये असणार 6 दिवस बँक बंद –
मार्चमध्ये सलग 6 दिवस बँक बंद असू शकते. सुट्ट्या आणि संपामुळे बँका बंद राहतील. जर बँक कर्मचाऱ्यांचा संपांवर दिलासा मिळत नाही तर बँक 10 ते 15 मार्चपर्यंत बंद असू शकतात.

या तारखा लक्षात ठेवा –
मार्चमध्ये संप आणि सुट्ट्या यामुळे बँकेच्या कामकाजावर 10 मार्च ते 15 मार्च परिणाम होऊ शकतो. 10 मार्चला धुलीवंदन आहे यामुळे बँक बंद असेल. याशिवाय बँक युनियनने 11 ते 13 मार्च या तीन दिवस संपाचा इशारा दिला आहे. 14 मार्चला दुसरा शनिवार आहे आणि 15 मार्चला रविवार आहे. 10 मार्चपासून लागोपाठ 6 दिवस बँक बंद असतील, परंतु यापूर्वी 8 मार्चला रविवार आहे. दुसऱ्या आठवड्यात बँक फक्त 9 मार्चला सुरु राहिलं.

ATM होऊ शकतात रिकामे –
6 दिवस सलग सुट्ट्या आणि सण असल्याने पैशांची चणचण भासू शकते. बँक बंद असल्याने एटीएममध्ये कॅश भरणाऱ्या एजेंसीला देखील कॅश मिळण्यास समस्या येईल. तसेच होळी असल्याने एटीएममधून कॅश काढणाऱ्यांची संख्या देखील जास्त असेल, त्यामुळे एटीएममधील कॅश लवकर संपू शकते. म्हणूनच होळीपूर्वी तुम्ही कॅश काढल्यास तुम्हाला समस्या येणार नाही.

बँक तीन दिवस संपावर –
बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या, बँकांचे विलिनीकरण आणि सॅलरी रिवाइजसारख्या मागण्या घेऊन 11 ते 13 मार्चपर्यंत तीन दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यापूर्वी देखील बँक कर्मचाऱ्यांनी 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला दोन दिवस संपावर होत्या. मार्चमध्ये 11,12 आणि 13 मार्चला कर्मचारी संपावर आहेत. त्यांचे म्हणणे आहे की अद्यापही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. जर हा संप झाला तर लोकांच्या समस्या वाढतील.