Father’s Day Special : बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांनी ‘अशी’ साकारली वडिलांची भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नेहमीच आईवर कथा आणि कविता अनेकजन लिहून आईवरचे प्रेम व्यक्त करतात. वडिलांची भूमिका नेहमीच जबाबदारीने झाकली जाते. वडिल कधीच आपले प्रेम व्यक्त करत नाही. त्यामुळे कवितांमध्ये वडिलांच्या नात्याविषयी फार कमी लिहले जाते. बॉलिवूडमध्ये देखील अनेक चित्रपटात वडिलांची भूमिका फार कठोर दाखविली गेली आहे मात्र, काही चित्रपटांमध्ये असेही चित्रपट आहे ज्यामध्ये मुलगा आणि वडिल यांचे नाते असे दाखविले जाते ते आपण कधीच विसरु शकत नाही. यामध्ये अनेक कलाकारांनी वडिलांची भूमिका छान प्रकारे साकारली आहे. काही कलाकारंच्या भूमिकेबद्दल आपण जाणून घेऊया…

अनुपम खैर
१९८४ मध्ये आलेला चित्रपट ‘सारांश’ मध्ये अनुपम खैर यांनी एक अशा वडिलांची भूमिका निभावली होती. ज्याच्या मुलाचा अमेरिकेत मृत्यू झालेला आहे. मुलाची अस्थी मिळवण्यासाठी वडिलांना देशात सरकारी दफ्तरमध्ये चकरा माराव्या लागतात. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर एक वडिल आपली जबाबदारी कशी निभवतात हे चित्रपटात दाखविले आहे.

कमल हसनची ‘चाची ४२०’

१९९७ मध्ये चित्रपट ‘चाची ४२०’ आपल्याला लक्षातच असेल. यामध्ये चाचीची भूमिका साकरणारे कमल हसन आणि त्याची मुलगी या दोघांच्या नात्याविषयी दाखविले आहे. चित्रपटात मुलगी आणि पत्नीपासून वेगळे राहणारे कमल हसन यांना मुलीची आया बनण्याची संधी मिळते. त्यामुळे तो आपल्या लुकला बदलून बाई बनून त्यांच्या घरात जातो. या चित्रपटात कॉमेडीबरोबरच मुलीवरचे प्रेम दाखविले आहे.

अनिल कपूर आणि करिश्मा यांचा रिश्ते

२००२ मध्ये ‘रिश्ते’ चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये एक वडिल आपल्या मुलाला मिळविण्यासाठी किती संघर्ष करतो. त्याचबरोबर त्याला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो. हे दाखविले आहे. या चित्रपटात वडिल आपल्या मुलाला पुन्हा मिळवण्यासाठी लाचार, दुखी किती असतो त्याचबरोबर एवढे संकटे असून देखील त्याची हिंमत दाखविली आहे.

अजय देवगणचा ‘मैं ऐसा ही हूं’
अजय देवगण आणि सुष्मिता सेन यांचा चित्रपट ‘मैं ऐसा ही हूं’ २००५ मध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये अजयने एक मानसिक रोगी वडिलांची भूमिका साकारली आहे. आपल्या मुलीचा कस्टडी घेण्यासाठी जीव संकटात टाकून लढत असतो आणि न्यायालयात दाखवून देतो की तो आपल्या मुलीची जबाबदारी घेण्यासाठी एक चांगला पिता आहे. यामध्ये मुलगी आणि पिता याचे नाते ‘फादर्स डे’ ला पाहणे खास ठरेल.

अभिषेक आणि विद्या बालन यांचा ‘पा’ चित्रपट
अमिताभ, अभिषेक आणि विद्या बालन यांचा सुपरहिट चित्रपट ‘पा’ २००९ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात वडिल आणि मुलाचे नाते अनोखे दाखविले आहे. या चित्रपटात पीड़ित मुलाची भूमिका करणारे अमिताभ बच्चन आणि त्यांच्या वडिलांची भूमिका करणारे अभिषेक यांचे नाते वेगळेच दाखविले आहे.

अमिताभ बच्चन आणि दीपिका ‘पीकू’

दीपिका पादूकोणने ‘पीकू’ बनून अनेक चाहत्यांचे मन जिंकले आहे. यामध्ये पीकूचे पिता अमिताभ बच्चन यांनी एक मॉर्डन वडिलांची भूमिका साकारली आहे. नेहमी भांडणारे वडिल आणि मुलगी यादोघांची भूमिका अमिताभ आणि दीपिका यांनी खूप छानप्रकारे निभावली आहे, पिताची जबाबदारी आणि आदर्श मुलीची कहानी तुम्ही नक्कीच पाहिली पाहिजे.

आरोग्यविषयक वृत्त –

 श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात