Mustard Oil : केस गळती, कोंडा नष्ट होतो, स्कीन ड्रायनेस, टॅनिंगपासून होते मुक्ती, जाणून घ्या 8 फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आज सुंदर आणि तरूण दिसण्यासाठी प्रत्येकजण महाग आणि हानिकारक प्रॉडक्ट्स वापरतात. याचा घातक परिणाम चेहऱ्यावर आणि बॉडीवर होताना दिसतो. जर तुम्हाला नैसर्गिकपणे सुंदर आणि तरूण दिसायचं असेल तर आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) नॅचरल सन्स्क्रीन-
मोहरीच्या तेलाव्यतिरीक्त दुसरं उत्तम सन्स्क्रीन दुसरं कोणतंच नाही. यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असतं. यामुळे सुर्यापासून येणाऱ्या हानिकारक किरणांपासून त्वचेचा बचाव होतो. यामुळे सुरकुत्याही लवकर येत नाहीत.

2) केस काळे राहतात-
मोहरीच्या तेलात ते गुणधर्म असतात ज्यामुळे तुमचे केस दीर्घकाळ काळे राहतात. यामुळं केस पांढरे होत नाहीत. याचा थेट वापर केसात लावण्यासाठी केला जातो. हे तेल केसात लावून अर्ध्या तासात शॅम्पू करा.

3) त्वचेचा रंग उजळतो –
आपण ज्या क्रिम त्वचा गोरी करण्यासाठी वापरतो त्यात खूप हानिकारक असतात. परंतु मोहरीचं तेल चांगलं असतं. यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. काही दिवस याचा वापर चेहऱ्यावर करा. तुमहाला काही दिवसांमध्ये लगेच फरक जाणवेल. याच्या वापरानं चेहऱ्यावरील टॅनिंग, डार्क स्पॉट आणि ब्लेमिशिंग नष्ट होते. तुम्ही बेसनपीठात लिंबू आणि मोहरीचं तेल मिक्स करा. याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिट ठेवल्यानंतर चेहरा धुवून घ्या. चांगला रिजल्ट मिळवण्यासाठी आठवड्यात किमान 3 वेळा याचा वापर करा.

4) चेहरा गोरा होऊन चमक येते, ग्लो वाढतो-
अनेकांना वाटतं मोहरीचं तेल वापरल्यानं चेहरा काळा पडतो. परंतु असं अजिबात नाही. तुम्ही मोहीरचं तेल आणि खोबरेल तेल समान प्रमाणात घ्या आणि हे मिश्रण थेट चेहऱ्यावर आपल्या हातांनी लावा. हलक्या हातांनी मालिश करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. याच्या नियमित वापरानं चेहऱ्यावर चमक येते. चेहरा गोरा होऊन ग्लो वाढतो.

5) बॉडी मसाजनं नॅचरल ग्लो-
मोहरीच्या तेलानं स्किन ड्रायनेसचा प्रॉब्लेम नष्ट होतो. याच्या वापरानं टॅनिंग जाईल. मोहरीच्या तेलात दही आणि लेमन ज्यूस मिक्स करा. यानं बॉडी मसाज करा. बॉडीवर नॅचरल ग्लो येईल.

6) स्किन असेल ड्राय तर…-
जर स्किन ड्राय असेल आणि मेकअप करायचा असेल तर काही थेब मोहरीचं तेल घ्या आणि 3 ते 4 मिनिट चेहऱ्यावर मसाज करा. यानंतर पाण्यानं चेहरा धुवून काढा. यामुळं स्कीन स्मूथ होईल. यानंतर सहज मेकअप करू शकाल.

7) केस गळणं, कोंडा आणि खाज –
केस गळणं, कोंडा आणि डोक्याला खाज येत असेल तर मोहरीचं तेल एक हॉट ट्रीटमेंट आहे. मोहरीचं तेल घ्या. थोडं गरम करा. यानंतर डोक्याला लावून मसाज करा. यानंतर एखाद्या माईल्ड शॅम्पूनं वॉश करा. 10 ते 12 दिवसांतच साऱ्या समस्या समूळ नष्ट होतील.

8) ओठांसाठी फायदेशीर –
थंडीत रात्री झोपताना लिप्सवर तीन ते चार थेंब मोहरीचं तेल लावा. यानंतर लिप बाम लावा. हा खूप जुना नुस्खा आहे. याशिवा बेंबीत याचे दोन थेंब सोडणंही उपयोगी ठरतं.