Mustard Oil Price | मोहरीच्या तेलात झाली घसरण, लोकांना मिळाला मोठा दिलासा, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mustard Oil Price | अनेक दिवसांपासून मोहरीच्या तेलाचे दर (Mustard Oil Price ) अव्वाच्या सव्वा वाढत होते, मात्र आता ते शांत झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या तेलाची किंमत सातत्याने खाली येत आहे. आता उत्तर प्रदेशात मोहरीच्या तेलाची घाऊक किंमत 154 रुपये प्रति लिटरवर आली आहे. एक काळ असा होता की मोहरीचे तेल 200 रुपयांच्या पुढे गेले होते. बिहारमध्येही आता मोहरीच्या तेलाची किंमत 175 रुपयांवर आली आहे.

 

मोहरीच्या तेलाचे दर कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे मोहरीच्या किमतीत झालेली घट आणि तेलाची मागणी मंदावणे हे आहे. उत्तर भारतात मोहरीचे तेल जास्त वापरले जाते. त्याच वेळी, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सूर्यफूल, सोयाबीन, करडई, भुईमूग यासारख्या इतर तेलांचा वापर जास्त होतो. भाव वाढल्याने मोहरीच्या तेलाची मागणीही कमी झाली आहे. (Mustard Oil Price)

 

हे आहेत ताजे भाव

Commodity Online dot com नुसार, उत्तर प्रदेशमध्ये गुरुवार, 1 सप्टेंबर रोजी मोहरीच्या तेलाची किंमत 154 रुपये प्रति लिटर आहे. 31 ऑगस्टलाही उत्तर प्रदेशात मोहरीच्या तेलाचा भाव 171 रुपये प्रति लिटर होता. म्हणजेच आज मोहरीच्या तेलाचे दर खाली आले आहेत. काही महिन्यांपूर्वी मोहरीच्या तेलाचा भाव 210 रुपयांवर पोहोचला होता.

गाझियाबाद, उत्तर प्रदेशमध्ये मोहरीच्या तेलाचा आजचा भाव 160 रुपये प्रति लिटर आहे. त्याचवेळी राजधानी लखनऊमध्ये 154 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. मेरठमध्ये 170 रुपये, अलीगढमध्ये 144 रुपये आणि कानपूरमध्ये 200 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. गौतम बुद्ध नगरमध्ये मोहरीचे तेल 160 रुपये आणि रायबरेलीमध्ये 156 रुपयांना विकले जात आहे.

 

मोहरीचे भाव झाले कमी

Advt.

गेल्या काही काळापासून देशात मोहरीचे दरही खाली आले आहेत.
एकेकाळी 8 हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेलेले मोहरीचे दर आता 6000 ते 6500 रुपयांच्या घरात आहेत.
उत्तर प्रदेश मोहरीचा भाव 6100 रुपये प्रतिक्विंटल आहे.
त्याचबरोबर हरियाणात मोहरीचा सरासरी दर 5750 रुपये प्रतिक्विंटल आहे.
त्याचप्रमाणे मध्य प्रदेशात मोहरी 6 हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली जात आहे.

 

Web Title : –  Mustard Oil Price | mustard oil price today update in up uttar pradesh mustard oil fall know latest rate

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा