MG George Death : मुथूट ग्रुपचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचे निधन; दिल्लीमध्ये घेतला शेवटचा श्वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुथूट ग्रुपचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचे आज निधन झाले. त्यांनी देशाची राजधानी दिल्ली येथे वयाच्या ७१ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. एमजी जॉर्ज मुथूट देशाचे नामांकित व्यापारी म्हणून ओळखले जात होते.

एमजी जॉर्ज मुथूट यांचा जन्म २ नोव्हेंबर १९४९ रोजी केरळ येथे झाला. असे सांगितले जात आहे की, जॉर्ज मुथूट त्यांच्या घराच्या पायरीवरून पडले होते. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. माहितीनुसार, त्यांचा संध्याकाळी ६.५८ च्या सुमारास मृत्यू झाला.

एमजी जॉर्ज मुथूट यांच्या नेतृत्वाखाली मुथूट समूहाची प्रमुख कंपनी मुथूट फायनान्स लिमिटेड, एनबीएफसी यांच्यामध्ये भारताची सर्वांत मोठी सोन्याची वित्तपुरवठा करणारी कंपनी बनली. त्यांच्या नेतृत्वाखाली मुथूट समूहाने जगभरात ५५०० पेक्षा अधिक शाखा आणि २० पेक्षा अधिक विविध व्यवसायांचा विस्तार केला.

२०२० ला फोर्ब्स एशिया मॅगनीजच्या माध्यमातून एमजी जॉर्ज मुथूट २६ वे श्रीमंत भारतीय आणि सर्वांत श्रीमंत मल्याळी म्हणून घोषित केले. यासोबतच २०२० मध्ये फोर्ब्स एशिया मॅगनीजने त्यांना केरळचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केले.