Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mutual Fund Investment | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा कल झपाट्याने वाढला आहे. म्युच्युअल फंड (Mutual Fund Investment) आणि Systematic Investment Plan (SIP) मधील गुंतवणूक दर महिन्याला वाढत असल्याचेही आकडेवारीवरून दिसून येत आहे. एफडीवरील घटत्या रिटर्न्समुळे (Returns On Fixed Deposit Investment) लोकांचे या दिशेने आकर्षण वाढले आहे. साधारणपणे, म्युच्युअल फंड योजना 12-13 टक्के वार्षिक रिटर्न देतात. जर तुमच्या हातात चांगली योजना आली तर हा रिटर्न 15 ते 24 टक्क्यांपर्यंत पोहोचतो. 200 रुपयांच्या एसआयपीसह एक कोटीचा निधी कसा बनवता येईल ते जाणून घेवूयात. (Mutual Fund Investment)

 

12 टक्के रिटर्नवर
समजा तुम्ही एसआयपी अंतर्गत दररोज 200 रुपये म्हणजेच दरमहा 6000 रुपये गुंतवता. तुमच्या फंडावरील 12 टक्के रिटर्न विचारात घेतल्यास, तुम्ही 21 वर्षांत 68.3 लाख रुपयांचा निधी तयार करू शकता. सर्व गुंतवणूक वेबसाइट्सवर म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटरचा पर्याय उपलब्ध आहे ज्यामुळे तुम्ही किती पैसे जमा केल्यानंतर किती वर्षात किती फंड तयार होईल हे पाहू शकता. (Mutual Fund Investment)

 

15% रिटर्नवर
एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार (SIP Calculator), जर तुम्ही एका स्कीममध्ये 21 वर्षांसाठी दरमहा रुपये 6000 (प्रतिदिन 200 रुपये) जमा केले. या गुंतवणुकीवर तुम्हाला 15% रिटर्न मिळाला. तर 21 वर्षांनंतर तुमच्याकडे 1.06 कोटी रुपयांचा निधी असेल.

एसआयपीमध्ये कंपाउंडिंगचे फायदे
एसआयपीमध्ये चक्रवाढीचा फायदा प्रचंड आहे. उदारणार्थ, तुम्ही 21 वर्षात दररोज 200 रुपयांपैकी केवळ 15.12 लाख रुपये गुंतवले आहेत. जर तुम्हाला या गुंतवणुकीवर 15 टक्के रिटर्न मिळाला तर तुम्हाला 91.24 लाख रुपयांचा फायदा होईल. म्हणजेच, तुम्हाला गुंतवणुकीतून 6 पट जास्त नफा मिळेल.

 

कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही एका स्कीममध्ये 21 वर्षांच्या ऐवजी 25 वर्षांसाठी दरमहा 6000 रुपये (प्रतिदिन 200 रुपये) जमा केले.
या गुंतवणुकीवर तुम्हाला 15% रिटर्न मिळेला. तर तुम्ही 25 वर्षांनंतर 1.97 कोटी रुपयांचा फंड तयार करू शकता.

 

Web Title :- Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

 

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

 

Corona in Maharashtra | ‘महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…