Mutual Fund | या दिवाळीत आपल्या मुलांना द्या म्युच्युअल फंडची भेट, 20 वर्षात होईल करोडपती

नवी दिल्ली : Mutual Fund | आपल्या मुलांच्या भविष्यासाठी पालक विविध प्रकारचे प्लॅनिंग करतात. पालकांची जी स्वप्न असतात ती सर्व लक्ष्य केवळ म्युच्युअल फंडमधूनच पूर्ण केली जाऊ शकतात. मुलांच्या नावाने म्युच्युअल फंड (mutual fund) ची सुरूवात करून 20 वर्षानंतर त्यांच्या बहुतांश इच्छा-आकांक्षा पूर्ण करू शकता. यासाठी आम्ही असे काही म्युच्युअल फंड सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणुक करून आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकता.

एचडीएफसी चिल्ड्रन्स गिफ्ट फंड (HDFC Children’s Gift Fund)

एचडीएफसी चिल्ड्रन्स गिफ्ट फंडची सुरुवात 2 मार्च 2001 ला झाली होती. ज्यानंतर या फंडने 16.68 टक्केच्या हिशेबाने वार्षिक रिटर्न दिला आहे. बब्स्यूट रिटर्न बाबत बोलायचे तर 2345.37 टक्के रिटर्न पहायला मिळाला.

म्हणजे एक लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक 20 वर्षात 25.58 रुपये झाली आहे. जर कुणी 20 वर्षासाठी 10 हजार रुपये महिन्याची एसआयपी केली असती तर त्याचे मूल्य आज 1.55 कोटी रुपये झाले असते. या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही 5000 रुपये एकरक्कमी आणि 500 रुपये एसआयसीने (Mutual Fund) सुरूवात करू शकता.

आयसीआयसीआय प्रुडेंशियल चाईल्ड केयर फंड (ICICI Prudential Child Care Fund)

आयसीआयसीआय प्रुडेंशियल चाईल्ड केयर फंड बाबत बोलायचे तर त्याची सुरूवात 31 ऑगस्ट 2001 ला झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत हा फंड 15.90 टक्केच्या हिशेबाने वार्षिक रिटर्न दिला आहे. एब्सल्यूट रिटर्नबाबत बोलायचे तर तो 1856.40 दिसून आला आहे.

जर एखाद्या गुंतवणुकदाराने मुलासाठी 20 वर्षापूर्वी 1 लाख एकरकमी गुंतवले असते तर त्याचे मूल्य आज सुमारे 20.71 लाख रुपये झाले असते. जर 10,000 रुपये मासिक एसआयपी (Monthly SIP) अंतर्गत गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 1.22 कोटी रुपये झाले असते. या स्कीममध्ये किमान एकरकमी गुंतवणूक 5,000 रुपये आणि एसआयपी गुंतवणूक 100 रुपये आहे.

युटीआय चिल्ड्रन केयर फंड (UTI Children Care Fund)

युटीआय चिल्ड्रन केयर फंडची सुरुवात 12 जुलै 1993 ला झाली होती.
तेव्हापासून फंडने 11 टक्के वार्षिक रिटर्न दिला आहे. जर एब्सल्यूट रिटर्नबाबत बोलायचे तर तो सुमारे 151 टक्के दिसून आला.
येथे मागील 20 वर्षात 1 लाखाची एकरकमी गुंतवणूकीचे मूल्य सुमारे 9.16 लाख रुपये झाले (Mutual Fund) आहे.

तर 10,000 रुपये मंथली एसआयपीची 20 वर्षात व्हॅल्यू 78.85 लाख रुपये झाली आहे.
या योजनेत मिनिमम एकरकमी गुंतवणूक 1,000 रुपये केली जाऊ शकते.
तर 500 रुपये मिनिमम एसआयपीद्वारे गुंतवणूक केली जाऊ शकते.

टाटा यंग सिटीझन्स फंड (Tata Young Citizens Fund)

टाटा यंग सिटीझन्स फंड 10 जानेवारी 1996 ला लाँच झाला होता.
तेव्हापासून या फंडने आतापर्यंत 13.40 टक्केच्या हिशेबाने वार्षिक रिटर्न दिला आहे.
तर एकरकमी रिटर्न 2461.53 टक्के दिला आहे.

जर एखाद्या गुंतवणुकदाराने मागील 20 वर्षात 1 लाखाची एकरकमी गुंतवणूक केली असेल तर त्याची व्हॅल्यू सुमारे 14.76 लाख रुपये झाली आहे.
तर 10,000 रुपये मंथली एसआयपीची व्हॅल्यू 20 वर्षात 1.02 कोटी रुपये झाली.
या फंडमध्ये मिनिमम एकरकमी गुंतवणूक 500 रुपये आणि 150 रुपये एसआयपीद्वारे गुंतवणूक (SIP Investment) केली जाऊ शकते.

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Today | देशात पहिल्यांदा पेट्रोल पोहचले 120 रुपये लीटरवर; List मध्ये जाणून घ्या कोणत्या शहरात आहे सर्वात महाग इंधन

Mutual Fund Investment | ‘या’ 5 म्युच्युअल फंडने 1 वर्षात दिला 118% रिटर्न, तुम्ही सुद्धा केली आहे का गुंतवणूक?

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Mutual Fund | mutual fund give the gift of mutual funds to your child this diwali will become a millionaire in 20 years

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update