Mutual Fund SIP | दरमहिना 500 रुपये जमा करून लाखोचा फंड कसा तयार करावा, वाचा गुंतवणुक धोरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड हा गेल्या काही वर्षांत गुंतवणुकीच्या पसंतीच्या पर्यायांपैकी एक म्हणून समोर आला आहे. Mutual Fund SIP मध्ये गुंतवणूक करणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. FD मधील घटता व्याजदर आणि म्युच्युअल फंडातील चांगला रिटर्न यामुळे लोक याकडे आकर्षित होत आहेत. जर तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे.

 

जर गुंतवणुकीचा कालावधी 20 किंवा 25 वर्षे किंवा त्याहून जास्त असेल, तर तुम्ही म्युच्युअल फंडात कोणताही संकोच न करता गुंतवणूक करू शकता. चांगली गोष्ट अशी आहे की इतक्या मोठ्या कालावधीत तुमची छोटी गुंतवणूक रक्कम एक मोठा फंड बनेल. 500 रुपयांची मासिक गुंतवणूक 30 वर्षांत किती होईल ते जाणून घेवूयात…

 

एसआयपी आहे सर्वोत्तम
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम मार्ग एसआयपी मानला जातो. रिटर्नच्या बाबतीत, बहुतेक फंडांचा वार्षिक SIP रिटर्न दीर्घ मुदतीसाठी 12 टक्के किंवा त्याहून जास्त असू शकतो. येथे आपण या रिटर्नच्या आधारे गुंतवणुकीची रक्कम जाणून घेवू. एसआयपीचा फायदा असा आहे की तुम्हाला बाजारात थेट गुंतवणुकीचा धोका पत्करावा लागत नाही. (Mutual Fund SIP)

20 वर्षांचा फंड
जर तुम्ही रु. 500 चा मासिक एसआयपी सुरू केला, तर एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, तुम्ही वार्षिक सरासरी 12 टक्के रिटर्नवर सुमारे 5 लाख रुपयांचा कॉर्पस तयार करू शकता. यामध्ये 20 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 1.20 लाख रुपये असेल. तर अंदाजे रिटर्नची रक्कम 3.79 लाख रुपये असेल. जर तुम्हाला जास्त रिटर्न मिळाला तर ही रक्कम मोठी असू शकते.

 

25 वर्षांचा फंड
एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर 500 रुपयांची एसआयपी 25 वर्षे सुरू ठेवली, तर तुम्ही सुमारे 9.5 लाख रुपयांचा कॉर्पस तयार करू शकता.
यामध्ये तुमची 25 वर्षातील एकूण गुंतवणूक 1.50 लाख रुपये असेल, तर अंदाजे रिटर्नची रक्कम सुमारे 8.5 लाख रुपये असेल.

 

30 वर्षांचा फंड
एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, तुम्ही 30 वर्षांसाठी 500 रुपयांची एसआयपी सुरू ठेवल्यास, तुम्ही 17.65 लाख रुपयांचा कॉर्पस तयार करू शकता.
यामध्ये तुमची 30 वर्षातील एकूण गुंतवणूक 1.80 लाख रुपये असेल, तर अंदाजे रिटर्नची रक्कम 15.85 लाख रुपये असेल.

 

Web Title :- Mutual Fund SIP | mutual fund sip how to make a fund of lakhs by depositing 500 rupees every month

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा