Mutual Fund SIP | जर तुम्हाला सतावत असेल निवृत्तीनंतरची चिंता, तर 15 वर्षात सुद्धा जमा करू शकता 5 कोटी रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Mutual Fund SIP | जर तुम्ही वयाच्या 45 व्या वर्षी मुलांना सेटल करणे आणि होम लोनच्या हप्त्यातून बाहेर पडला असाल आणि 6 डिजिटमध्ये सॅलरी मिळत असेल तर पुढील 15 वर्षात तुम्ही तुमच्यासाठी 5 कोटी रुपयांचा रिटायर्डमेंट फंड जमा करू शकता. यासाठी म्युच्युअल फंड निवडावा लागेल. जाणकार म्हणतात की, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमधूनच (Mutual Fund SIP) मोठा रिटर्न मिळू शकतो.

इक्विटी बेस्ड म्युच्युअल फंड (equity based mutual funds)

जर तुम्ही दरमहिना 44 हजार रुपयांची गुंतवणूक केली आणि दरवर्षी 15 टक्केचा स्टेपअप म्हणजे 15 टक्केची वाढ केली तर 12 ते 15 टक्केच्या रेट ऑफ इंटरेस्टच्या हिशेबाने तुम्ही तुमचे लक्ष्य गाठू शकता. (Mutual Fund SIP) ऑप्टिमा मनी मॅनेजरचे एमडी आणि सीईओ पंकज मथपाल यांनी मिंटसोबत बोलताना सांगितले की,
इन्व्हेस्टर्सने गुंतवणुक करताना केवळ महागाई लक्षात ठेवू नये तर तुम्ही तुमच्या टार्गेटपासून मागे पडणार नाही, याकडे सुद्धा लक्ष ठेवा.
यासाठी गुंतवणुकदारांना इक्विटी बेस्ड म्युच्युअल फंड निवडला पाहिजे.

10 नव्हे तर 15 टक्केचा स्टेपअप आवश्यक

इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट एसआयपी इन्व्हेस्टमेंटमध्ये दरवर्षी 10 टक्केचा स्टेपअप म्हणजे दरवर्षी एसआयपीमध्ये 10 टक्के वाढ करण्याचा सल्ला देतात.
परंतु जर तुम्हाला 15 वर्षात 5 कोटी रुपयांचा फंड जमा करायचा असेल तर 15 टक्केचा स्टेपअप निवडावा लागेल.

 

काय आहे पूर्ण कॅलक्युलेशन

समजा जर 45 वर्षात एखाद्या गुंतवणुकदाराने दरमहिना 44000 हजार रुपयांची मंथली एसआयपी सुरू केली.
सोबतच मंथली एसआयपीमध्ये दरवर्षी 15 टक्के वाढ केली आणि वार्षिक रिटर्न 12 टक्केच्या जवळपास असेल तर 15 वर्षानंतर गुंतवणुकदाराचा फंड 5,00,39,132 रुपये होईल.
या 15 वर्षात 14 टक्के वार्षिक व्याज मिळाले तर तुमचा फंड 5.69 कोटी रुपये होऊ शकतो.

 

Web Title : Mutual Fund SIP | mutual fund sip if you are worried about retirement then in 15 years you can create rs 5 crore fund

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | बॉयफ्रेंड बनवण्याच्या उतावळेपणाने केले कंगाल, लावला तब्बल 73 लाखांचा चूना

Diabetes | डायबिटीज रूग्णांनी कधीही करू नयेत ‘या’ 6 चूका, आरोग्य होईल बरबाद; जाणून घ्या

Sonia Gandhi | काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित; सोनिया गांधींचा नेत्यांना सूचक संदेश