नवी दिल्ली : Mutual Fund SIP | जर योग्यवेळी योग्यप्रकारे गुंतवणूक (Investment tips) करण्याची सुरुवात केली तर निवृत्तीचा काळ सुखात जाऊ शकतो. होय…जर स्मार्ट आणि योग्य पद्धतीने लाँग टर्म गुंतवणूक (Mutual Fund SIP) केली तर 60 वर्षाच्या वयापर्यंत सहजपणे 23 कोटी रुपयांचा फंड बनवता येऊ शकतो. परंतु यासाठी योग्यवेळी गुंतवणूक सुरू करणे आवश्यक आहे.
बहुतांश गुंतवणुकदार म्युच्युअल फंडच्या मंथली SIP (Mutual fund SIP) मध्ये गुंतवणूक करतात परंतु योग्यप्रकारे करू शकत नाहीत. यामुळे सीपद्वारे गुंतवणुकदारांचे उत्पन्न वाढत नाही.
जाणून घ्या कधी करावी गुंतवणूक?
टॅक्स एक्सपर्टनुसार, जर कुणी गुंतवणुकदार SIP मध्ये 25 वर्षाच्या वयापासून गुंतवणूक सुरू करत असेल आणि निवृत्तीपर्यंत गुंतवणूक करत असेल तर तो सलग 35 वर्षापर्यंत गुंतवणूक करतो. यातून गुंतवणुकदाराला कंपाऊंडिंग इंटरेस्टचा लाभ मिळतो. यामुळे निवृत्तीच्या वेळी मोठा फंड तयार होतो.
35 वर्षापर्यंत गुंतवणूक केल्याने इन्व्हेस्टमेंटवर 12 ते 16 टक्के रिटर्न मिळतो.
गुंतवणुकदाराला गुंतवणुकीदरम्यान आणि नंतर महागाई लक्षात घेऊन 20 कोटींचा फंड तयार करावा लागेल.
जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट?
टॅक्स एक्सपर्टनुसार, जर एखादा गुंतवणुकदार 25 वर्षाच्या वयात 14500 रुपयांचा महिना सीप सुरू करत असेल आणि
60 वर्षाच्या वयापर्यंत यामध्ये गुंतवणूक करत असेल आणि 12 टक्के वार्षिक रिटर्न मिळाला तर गुंतवणुकदार 22.93 कोटी रुपयांचा फंड उभा करू शकतो. सीप गुंतवणूकदारांना निवृत्तीवेळी श्रीमंत बनवू शकतो.
Pune Crime | पुण्यात चोरट्यांनी मारला लेफ्टनंट कर्नलच्या घरातील दारुच्या बाटल्यांवर डल्ला