Mutual Fund SIP | दररोज गुंतवा 167 रुपये, निवृत्तीपुर्वी तुम्ही बनाल करोडपती, मिळतील 11.33 कोटी; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mutual Fund SIP | पैसे कमविणे (Make Money) आणि ते खर्च करणे सध्या खूपच सोपे झाले आहे. मात्र, कमाविलेला पैसा वाचवून त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक (Investment) करणे खूपच कठीण काम आहे. कधी कोणती योजना (Scheme) वर येईल आणि कधी कोणती कंपनी बुडेल याची शाश्वती राहिलेली नाही. परंतु SIP द्वारे म्युच्युअल फंडातील (Mutual Fund SIP) गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये लवकरात लवकर गुंतवणूक करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार तुम्ही नोकरी लागल्यानंतर लगेच गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे.

 

सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यांची एक विशेषता आणि महत्व आहे. गुंतवणूक सल्लागार नेहमीच लहानपणापासून गुंतवणूक सुरु करण्याचा सल्ला देतात. कारण यामध्ये तुम्हाला दीर्घ गुंतवणुकीचे लक्ष्य (Long-Term Investment Goals) आणि अधिक जोखीम (Risk) पत्करण्याची संधी (Opportunity) मिळते. SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करुन, तुम्ही दीर्घ मुदतीत करोडो रुपये कमावू शकता.

 

गुंतवणुकीचे गणित
तुम्ही जर वयाच्या 25 व्या वर्षी SIP द्वारे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्ही दरमहा 5000 रुपये वाचवले. म्हणजे दररोज 167 रुपये आणि SIP द्वारे म्युच्युअल फंडात (Mutual Fund SIP) गुंतवणूक केली, तर निवृत्तीच्या वयात म्हणजे 60 व्या वर्षी तुमच्याकडे 11.33 कोटी एवढी रक्कम असेल. हे लक्षात घ्या की एसआयपी मध्ये तुम्हाला दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढ करावी लगते. (Mutual Fund SIP)

 

– मासिक गुंतवणूक 5 हजार रुपये

– अंदाचे परतावा 14 टक्के

– वार्षीक SIP 10 टक्के वाढ

– एकूण गुंतवणुकीचा कालावधी 35 वर्षे

– एकूण गुंतवणूक 1.62 कोटी

– परतावा 9.70 कोटी

Advt.

– एकूण मिळणारी रक्कम 11.33 कोटी

तर निवृत्तीच्या आधी करोडपती व्हाल
एक गोष्ट लक्षात ठेवा की, दरवर्षी तुमचा पगार वाढल्यानंतर (Salary Increase) तुम्हाला त्यानुसार SIP गुंतवणूक वाढवावी लागेल. 35 वर्षांच्या दीर्घ कालावधीत, तुम्हाला चक्रवाढीचे मोठे फायदे मिळतील. म्युच्युअल फंड तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी 12-16 टक्के परतावा देते. जेव्हा तुम्ही दरवर्षी गुंतवणूक वाढवत जाल, तेव्हा तुम्ही निवृत्तीच्या (Retirement) खूप आधी करोडपती व्हाल.

 

Web Title :- Mutual Fund SIP | mutual fund sip invest rs 167 take rs 1133 crore in retirement in this investment plan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Narayan Rane | पुन्हा एकदा नारायण राणे VS शिवसेना वाद पेटणार ! मालवण चिवला बीचवरील निलरत्न बंगल्यावर कारवाईचे आदेश?

 

Garlic Health Benefits | जर लसणाला आले कोंब तर फेकू नका, यापासून आरोग्याला होतात अनेक फायदे; जाणून घ्या

 

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना मोठा झटका ! 18 महिन्यांच्या DA थकबाकीबाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय