खुशखबर ! दररोज फक्त 50 रूपयाची बचत करा अन् मिळवा 10 लाख रूपये, अतिशय सोपी पध्दत, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तुम्ही रोज काही पैशांची बचत करून योग्य गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्ही एका ठराविक काळानंतर लखपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला रोज केवळ ५० रुपयांची बचत करावी लागणार आहे. तुमचा रोजचा खर्च भागवून तुम्ही दिवसाला ५० रुपये नक्कीच वाचवू शकता. या पैशांची म्यूचुअल फंडच्या सिस्टमेटिक इन्वेस्टमेंट प्लॅन (SIP) च्या माध्यमातून नियमितपणे गुंतवणूक करावी लागेल. जाणून घेऊया कसे कमाऊ शकता तुम्ही १० लाख रुपये.

असे मिळतील १० लाख :
जर आपण रोज ५० रुपयांची बचत करत असाल तर याचे महिन्याला १५०० रुपये होतात. आपल्याला प्रत्येक महिन्याला १५०० रुपये असणाऱ्या म्यूचुअल फंड च्या स्कीम मध्ये SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करावी लागेल. ही गुंतवणूक १५ वर्षे केल्यास तब्बल १५ टक्के दराने रिटर्न मिळेल. असे झाल्यास आपल्याला १५ वर्षानंतर १० लाख रुपये मिळतील.

किती फायदा होणार :
जर तुम्ही कोणत्याही म्यूचुअल फंड स्कीम मध्ये रोज ५० रुपये गुंतवणूक केल्यास तुमची १५ वर्षांमधील एकूण गुंतवणूक २,७०,००० रुपये इतकी होईल. मात्र तुम्हाला १०,०२,७६० रुपये मिळतील. म्हणजे तुम्हाला एकूण ७,३२,७६० रुपये फायदा होईल.

या म्यूचुअल फंड ने दिले आहेत १५ % दराने रिटर्न :
अनेक कंपन्यांच्या म्यूचुअल फंड योजनांनी १५ वर्षांत १५ % दराने रिटर्न दिले आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ इक्विटी फंड मध्ये १५ वर्षांत १५.२० %, डीएसपी इक्विटी ऑपर्चुनिटी फंड ने १४.६७ टक्के तर फ्रैंकलिन इंडिया प्राइमा फंड द्वारे १५.०७ टक्क्यांनी रिटर्न मिळाले आहे.

असा काढतात एक्सपेन्स रेशो :
हा रेशो म्यूचुअल फंड च्या व्यवस्थापनासाठी येणाऱ्या खर्चाला प्रति युनिट च्या स्वरूपात दर्शवतो. कोणत्याही म्यूचुअल फंडचा एक्सपेन्स रेशो काढण्यासाठी त्याच्या एकूण संपत्तीला एकूण खर्चाने भागले जाते. हा रेशो म्यूचुअल फंड मधून मिळणारा फायदा तसेच सुरक्षितता दर्शवतो.

SIP द्वारे गुंतवणूकीचे फायदे :
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा एसआयपी उत्तम मार्ग आहे. याद्वारे, गुंतवणूकीची चांगली सरासरी रक्कम मिळते, जे गुंतवणूकीची जोखीम कमी करते आणि चांगल्या परताव्याची शक्यता वाढवते. म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी सुरू केल्यानंतर, आपण केवळ निर्धारित वेळेपर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक नाही. आपण जेव्हा इच्छित असाल तेव्हा ही गुंतवणूक थांबवू शकता. हे करण्यासाठी कोणताही दंड नाही.

आरोग्यविषयक वृत्त –