लाभदायी ! दररोज फक्त ४० रुपयांची ‘बचत’ करा आणि ‘मिळवा’ ८ लाख रुपये, जाणून घ्या

नवी दिल्ली :  तुम्ही रोज काही पैशांची बचत करून योग्य गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्ही एका ठराविक काळानंतर लखपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला रोज केवळ ४० रुपयांची बचत करावी लागणार आहे. तुमचा रोजचा खर्च भागवून तुम्ही दिवसाला ४० रुपये नक्कीच वाचवू शकता. या पैशांची म्यूचुअल फंड च्या सिस्टमेटिक इन्वेस्टमेंट प्लॅन (SIP) च्या माध्यमातून नियमितपणे गुंतवणूक करावी लागेल. जाणून घेऊया कसे कमाऊ शकता तुम्ही ८ लाख रुपये.

असे मिळतील ८ लाख : 
जर आपण रोज ४० रुपयांची बचत करत असाल तर याचे महिन्याला १२०० रुपये होतात. आपल्याला प्रत्येक महिन्याला १२०० रुपये असणाऱ्या म्यूचुअल फंड च्या स्कीम मध्ये SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करावी लागेल. ही गुंतवणूक १५ वर्षे केल्यास तब्बल १५ टक्के दराने रिटर्न मिळेल. असे झाल्यास आपल्याला १५ वर्षानंतर ८ लाख रुपये मिळतील.

किती फायदा होणार : 
जर तुम्ही कोणत्याही  म्यूचुअल फंड स्कीम मध्ये रोज ४० रुपये गुंतवणूक केल्यास तुमची १५ वर्षांमधील एकूण गुंतवणूक २,१६,००० रुपये इतकी होईल. मात्र तुम्हाला ८,०२,२०८ रुपये मिळतील. म्हणजे तुम्हाला एकूण ५,८६,२०८ रुपये फायदा होईल.

या  म्यूचुअल फंड ने दिले आहेत १५ % दराने रिटर्न : 
अनेक कंपन्यांच्या म्यूचुअल फंड योजनांनी १५ वर्षांत १५ % दराने रिटर्न दिले आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ इक्विटी फंड मध्ये १५ वर्षांत १५.२० %, डीएसपी इक्विटी ऑपर्चुनिटी फंड ने १४.६७ टक्के तर फ्रैंकलिन इंडिया प्राइमा फंड द्वारे  १५.०७  टक्क्यांनी रिटर्न मिळाले आहे.

असा काढतात एक्सपेन्स रेशो :
हा रेशो म्यूचुअल फंड च्या व्यवस्थापनासाठी येणाऱ्या खर्चाला प्रति युनिट च्या स्वरूपात दर्शवतो. कोणत्याही म्यूचुअल फंड चा  एक्सपेन्स रेशो काढण्यासाठी त्याच्या एकूण संपत्ती ला एकूण खर्चाणे भागले जाते. हा रेशो म्यूचुअल फंड मधून मिळणारा फायदा तसेच सुरक्षितता दर्शवतो.

आरोग्यविषयक वृत्त