Mutual Funds मध्ये पैसे गुंतवणार्‍यांसाठी मोठी बातमी ! SEBI नं शुक्रवारी बदलले अनेक नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सेबीने शुक्रवारी एक सर्क्युलर जारी करून मल्टी-कॅप फंड्सच्या विस्तृत पोर्टफोलियो स्ट्रक्चरबाबत माहिती दिली. अशाप्रकारच्या स्कीमला लार्ज, मिड आणि स्मॉल-कॅप्समध्ये किमान 25 टक्के रक्कम गुंतवणे जरूरी आहे. बाजार भांडवलीकरणाच्या आधारावर टॉप 100 कंपन्यांचे स्टॉक्स लार्ज-कॅपमध्ये येतात. यानंतर पुढील 150 स्टॉक्स मिड-कॅप्स आणि पुढील 250 स्टॉक्स स्मॉल कॅप्सच्या श्रेणीत येतात. सध्या स्कीमसाठी जानेवारी 2021 पर्यंत पालन करण्यास सुरूवात करावी लागेल. डिसेंबर 2020 पर्यंत असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप्स श्रेणीत येणार्‍या स्टॉक्सची नवी यादी प्रसिद्ध करेल.

काय आहे सध्याचा नियम?
सध्या, मल्टी कॅप फंड्समध्ये अलोकेशनबाबत सेबीचा नियम हे निर्धारित करत नाही की, लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप्समध्ये किती टक्के गुंतवणूक करायची आहे. अशा प्रकारच्या फंड्सला उच्चस्तराची फ्लेक्सिबिलिटी दिली आहे की, ते आपल्या हिशेबाने या मार्केट कॅप्सच्या भागीदारीला कमी किंवा जास्त करतील.

अशाप्रकारे पीपीएफएएस लाँग टर्म इक्विटी आपल्या पोर्टफोलियोचा 35 टक्केपर्यंतचा भाग इंटरनॅशनल स्टॉक्समध्ये सुद्धा गुंतवणुक करतात. मात्र, नव्या सर्क्युलरमध्ये अशाप्रकारचे स्टॉक्स कोणत्या कॅटगरीत सहभागी असतील, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

चांगले पाऊल
एक्सपर्टचे म्हणणे आहे की, मल्टी-कॅपबाबत नवे सक्युर्लर चांगले लेबल दर्शवतात. सध्या या फंड्समध्ये बहुतांश भाग लार्ज-कॅपचा आहे. याच कारणामुळे मल्टी-कॅप व लार्ज-कॅपमध्ये फरक करणे सुद्धा अवघड होते. भविष्यात प्रत्येक मल्टी-कॅपमध्ये सरासरी 70 टक्के लार्ज कॅप स्टॉक्स आहेत.

मिड-कॅपसाठी हा आकडा 22 टक्के आणि स्मॉल-कॅपसाठी 8 टक्के आहे. मात्र, अंदाज लावला जात आहे की, कमी कालावधीत मिड आणि स्मॉल-कॅप्समध्ये लिक्विडिटीची समस्या येऊ शकते.

एयुएमसुद्धा होईल शिफ्ट
सध्या मल्टी कॅपच्या असेट अंडर मॅनेजमेंट (एयुएम) बाबत बोलायचे तर ते 1.46 लाख कोटी रूपयांचे आहे. अशात या सर्क्युलरनंतर अपेक्षा आहे की, यामध्ये सुमारे 30 हजार कोटी रूपये पुढील काही महिन्यात मिड व स्मॉल कॅप्समध्ये शिफ्ट होतील. सेबीच्या नव्या नियमांच्या अंतर्गत या फंंड्सचे अलोकेशन 30 टक्केवरून वाढवून 50 टक्के केले जाणार आहे.