Mutual Funds SIP-Investment | म्युच्युअल फंड SIP ची जबरदस्त योजना ! 7 वर्षांत थोडीशी गुंतवणूक करा अन् मिळवा कमाल फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mutual Funds SIP-Investment | एक उत्तम गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic investment Plan-SIP) म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक (Investment) योजनाकडे पाहिले जातेय. यामधून चांगला निधी (Good Funding) मिळतो. प्रति महिना थोडे पैसे गुंतवून भविष्यासाठी मोठा निधी मिळवू इच्छिणाऱ्या अशा व्यक्तींसाठी एसआयपी हे एक उत्तम गुंतवणूकीचा पर्याय आहे. अशा म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूकदारांना (Mutual Funds SIP-Investment ) माहिती असणे आवश्यक आहे.

 

इन्वेस्को इंडिया डायनॅमिक इक्विटी फंड-डायरेक्ट प्लॅन ग्रोथ (Invesco India Dynamic Equity Fund-Direct Plan Growth) असं या योजनेचं नाव आहे. इन्वेस्को इंडियाच्या या योजनेमध्ये, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 7 वर्षांसाठी दहा हजार मासिक एसआयपीए केले असेल, तर त्याच्याकडे 11.37 लाख रुपयांचा निधी जमा केला आहे. गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवण्यासाठी म्युच्युअल फंड (MF) योजनेबद्दल जाणून घ्या. (Mutual Funds SIP-Investment)

 

12 टक्के वार्षिक परतावा दिला –
ही योजना 2 जानेवारी 2013 रोजी लॉन्च करण्यात आलीय. या योजनेने 12 टक्के वार्षिक आणि 191 टक्के परिपूर्ण परतावा दिलाय. या म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना अल्फा परतावा दिलाय. कारण या श्रेणीतील योजनांची सुरुवातीपासून सरासरी परतावा 8.40 टक्के आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील एका वर्षात 2.50 टक्के वार्षिक आणि परिपूर्ण परतावा दिलाय. मागील 3 वर्षांचा वार्षिक परताव्याचा दर 7.65 टक्के आहे. तर परिपूर्ण परतावा 24.80 टक्के आहे. तसेच, मागील 5 वर्षांत या योजनेने 7.75 टक्के वार्षिक परतावा आणि 45.35 टक्के परिपूर्ण परतावा दिला आहे.

दरम्यान, समजा, एखाद्या गुंतवणूकदाराने 3 वर्षे अगोदर या योजनेत 10 हजार रुपयांची मासिक एसआयपी केली असती, तर आज त्याची गुंतवणूक 4.09 लाख रुपये झाली असती. तसेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या योजनेत दरमहा 10 हजार रुपयाची एसआयपी सुरू केली असेल, तर आज त्याच्याकडे 7.26 लाख रुपये असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत 7 वर्षांपूर्वी 10 हजार रुपये प्रति महिना गुंतवायला सुरुवात केली असती, तर आज त्याची गुंतवणूक 11.37 लाख रुपये झाली असती. असं व्हॅल्यू रिसर्चच्या (Value Research) आकडेवारीनुसार समोर आलं आहे.

 

‘या’ योजनांनी दिला चांगला नफा –
एचडीएफसी बॅलन्स्ड अ‍ॅडव्हांटेज फंड-डायरेक्ट प्लॅन-ग्रोथ, टाटा बॅलन्स्ड ऍडव्हांटेज फंड-डायरेक्ट प्लॅन -ग्रोथ,
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलन्स्ड ऍडव्हांटेज फंड-डायरेक्ट प्लॅन-ग्रोथ आणि एडलवाईस बॅलन्स्ड ऍडव्हांटेज फंड-डायरेक्ट प्लॅन-ग्रोथ.
इन्वेस्को इंडिया डायनॅमिक इक्विटी फंड-डायरेक्ट प्लॅन ग्रोथने उत्कृष्ट परतावा मिळवून दिला आहे.

 

Web Title :- Mutual Funds SIP-Investment | mutual funds sip investment 7 years small investment will give you big profit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | मोदी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ एकाच अटीवर वेतनाशिवाय मिळतील 30 हजार रुपये; जाणून घ्या

 

Maharashtra 12th Result 2022 | 12 वी बोर्डाचा निकाल ‘या’ तारखेला लागण्याची शक्यता; विद्यार्थी-पालकांची उत्सुकता शिगेला

 

Kirit Somaiya On Uddhav Thackeray | ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादला आमदार विकत घ्यायला चाललेत का?’ – किरीट सोमय्या