Mutual Funds SIP | ‘या’ ब्ल्यूचिप फंड्सने शानदार दिला रिटर्न; जाणून घ्या 5 वर्षात किती केली ‘कमाई’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mutual Funds SIP गुंतवणुकदारांसाठी कमाई आणि सेव्हिंग करण्याची सोपी पद्धत बनली आहे. विशेषता त्या गुंतवणुकदारांसाठी जे मोठी रक्कम गुंतवू शकत नाहीत. अशावेळी छोटी छोटी रक्कम दरमहिना एसआयपीच्या माध्यमातून गुंतवून मोठ्या कालावधीत मोठी कमाई करू (Mutual Funds SIP) शकता.

आज अशाच काही ब्ल्यूचिप बेस्ड इक्विटी म्युच्युअल (blue chip based equity mutual funds) ची माहिती घेणार आहोत, ज्यांनी 5 वर्षात लोकांना जोरदार कमाई करून दिली आहे. विशेष म्हणजे या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही 100 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यत प्रति महिना एसआयपी करू (Mutual Funds SIP) शकता.

 

1. अ‍ॅक्सीस ब्ल्यूचिप फंड (Axis Bluechip Fund)
या फंडची सुरुवात जानेवारी 2013 मध्ये झाली होती. तेव्हापासून या फंडने 331.27 टक्केचा रिटर्न दिला आहे. तर वार्षिक रिटर्न 18.05 टक्केचा दिसून आला. 1000 रुपये प्रति महिना एसआयपीद्वारे वर्षात 12 हजार रुपयांची गुतवणूक आणि 5 वर्षात 60 हजार रुपयांची गुंतवणूक करता.

यातून 23.7 टक्के वार्षिक रिटर्नसह 1,07,981 रुपये मिळतील. जर तुम्ही एकरकमी 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वार्षिक 19.96 टक्क्के रिटर्नच्या हिशेबाने सुमारे 24,864 रुपये मिळतील. (Mutual Funds SIP)

 

2. कॅनरा रोबेक्को ब्लयूचिप इक्विटी फंड (Canara Robeco Bluechip Equity Fund)
या फंडची सुरूवात सुमारे 11 वर्षांपूर्वी झाली होती. ज्याने तेव्हा 328 टक्के एकुण रिटर्न दिला आहे. वार्षिक रिटर्न सुमारे 14 टक्के पहायला मिळाला. 5 वर्षासाठी एक हजार रुपये महिना एसआयपी केल्यास गुंतवलेली रक्कम 60 हजार रुपये होईल.

तेव्हा 22.61 टक्के वार्षिक रिटर्नच्या हिशेबाने 105172.21 रुपये देईल. या फंडमध्ये 10 हजार रुपये एकरकमी जमा केल्यास 17.35 टक्के वार्षिक रिटर्नच्या हिशेबाने 22273.70 रुपये रिटर्न मिळेल. म्हणजे या दरम्यान एकुण 122.74 टक्के रिटर्न मिळेल.

3. मिराए असेट इमर्जिंग ब्लयूचिप फंड (Mirae Asset Emerging Bluechip Fund)
या फंडची सुरूवात ऑगस्ट 2010 मध्ये झाली होती.
ज्यानंतर आतापर्यंत या फंडने एकुण 900 टक्केपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे.
म्हणजे फंडने वार्षिक 22.63 टक्केचा रिटर्न दिला आहे.

 

जर एखाद्या फंडात 5 वर्षासाठी 10 हजार रुपये एकरकमी गुंतवणूक केली असेल तर 25,422.40 रुपये मिळतील.
म्हणजे गुंतवणुकदारांला एकुण 154.22% टक्केचा रिटर्न मिळाला आहे. (Mutual Funds SIP)

 

एसआयपी बाबत बोलायचे तर 5 वर्षासाठी 1000 रुपयांची मिनिमम एसआयपी करून 60000 हजार रुपये गुंतवणुक करता.
ज्यामधून 26.48 टक्के वार्षिक रिटर्नसह 115414 रुपये मिळतील.

 

Web Title :- Mutual Funds SIP | mutual funds sip these blue chip funds gave great returns know how much they earned in 5 years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dilip Walse Patil | समीर वानखेडेंच्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेशी ‘जुजबी’ चर्चा; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले…

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; ‘द गेम चेंजर्स’ संघाने उद्घाटनाचा दिवस गाजवला

Pune Navale Bridge | नवले पूलाची समस्या सोडविण्यासाठी पुणे महापालिका उचलणार ‘हे’ पाऊल, महापौरांनी दिले आदेश