होय, खरचं ! भारतातील मुस्लीम महिला बनवत आहेत PM चं मंदिर, म्हणाल्या – ‘आम्ही मोदीजींच्या सोबत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील मुज़फ्फरनगर येथील काही महिलांनी डीएम ऑफिसमध्ये जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधण्यासाठी प्रशासनाला एक अर्ज दिला आहे. मोदी मुस्लिम महिलांसाठी मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे मंदिर उभारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कृष्णापुरी भागात बनवणार मंदिर –
रूबी गजनी या महिलेने याविषयी बोलताना सांगितले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांकडे अर्ज दिला आहे. आम्ही कृष्णापुरी भागात मोदींचे मंदिर बांधणार आहोत. मोदी मुस्लिम महिलांसाठी आणि समाजासाठी मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. म्हणून आम्ही त्यांचे मंदिर बांधणार आहोत.

पैसे जमा करून बांधत आहेत मंदिर –
याविषयी अधिक माहिती देताना या महिलांनी सांगितले कि, आम्ही सर्व महिला पैसे जमा करून मोदींचे मंदिर बांधत आहोत. त्याचबरोबर आम्ही सर्व मुस्लिम महिला मोदींच्या बरोबर असल्याचा देखील संदेश देत आहोत. त्यांनी अनेक चांगली कामे केली आहेत. लोकांना घरे बांधून दिली आहेत. घराघरात गॅस देखील दिला आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे मंदिर बांधणार असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला.

Visit : Policenama.com