आश्‍चर्य ! उघड्यावर अंतर्वस्त्र हडकण्यासाठी टाकल्यानं FIR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुजफ्फरनगरमध्ये मागील 24 वर्षांपासून भ्रष्टाचार आणि भूमाफियांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मास्टर विजय सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या  गुण्यामागील कारण देखील फार मजेदार आहे. आंदोलनस्थानी अंतर्वस्त्र सुकवल्याने त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच मुजफ्फरनगरच्या अधिकारी शैलजा कुमारी यांनी त्यांना आंदोलांवरून उठवले होते. येथील एका पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात कलम 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय कुमार नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे. आंदोलनस्थळी खुल्यावर अंतर्वस्त्र सुकवल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी देखील या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंदवून घेत तपास देखील सुरु केला आहे. त्याचबरोबर कायदेशीर कारवाई देखील सुरु केली आहे. याप्रकरणी बोलताना मास्टर विजय सिंह म्हणाले कि, मी मागे हटणार नाही, मी माझा संघर्ष सुरूच ठेवणार आहे. तुम्ही मला हवे तर फासावर टांगा. तसेच ते अंतर्वस्त्र माझे नव्हतेच असंदेखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दरम्यान, या प्रकरणावर कोणताही पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यावर भाष्य करण्यास तयार नाही. गुंडाच्या बळावर हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आम्ही त्याचा विरोध करणारच,असे विविध राजकीय नेत्यांनी यावर बोलताना म्हटले आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like