धक्कादायक ! 1 हजारात धमकी, 5 हजारात ‘खल्लास’, तरुणाने सोशल मिडियावर गुंडगिरीच्या रेटचा दरपत्रकच केलं प्रसिध्द

मुजफ्फरनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भाईगिरीचा शौक असलेली मुले बऱ्याचवेळा सोशल मीडियातून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतात. असाच एक किस्सा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एका युवकाने हातात पिस्तूल घेऊन त्याचा फोटो फेसबुकवर अपलोड केला आहे. मात्र फोटोने पोलिसांची झोप मात्र उडाली आहे. त्याने गुंडागिरीच्या आपल्या कामाची यादीच सोशल मीडियावर (youth-issued-hooliganism-tender-facebook) प्रसिध्द केली आहे. ज्यामध्ये मारणे, धमकी देणे, जखमी करणे आणि ठार मारण्याचा दर काय असेल हे या यादीत मेन्शन केले आहे. गुंडगिरीच्या या रेटचा फोटो सोशलवर मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

हा फोटो उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील (muzaffarnagar)चरथावल पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका युवकाचा असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिस त्या युवकाचा शोध घेत आहेत.मध्यंतरी टिकटॉकसारख्या माध्यमातून असे अनेक युवक पुढे आले, कोणी हातात गन घेऊन शूट करत होते तर कोणी तलवार. अनेकांनी या माध्यमातून फेमस होण्याचा प्रयत्न केला होता. तलवारीने केक कापण्याचे व्हिडीओ खूपदा पाहिले होते. मात्र या युवकाने हातात पिस्तुल घेऊन सोशल मीडियावर त्याच्या कामाची यादी टाकली आहे, यात धमकीसाठी 1 हजार रुपये, एखाद्याला मारण्यासाठी 5 हजार, गंभीर जखमी करण्यासाठी 10 हजार रुपये आणि ठार मारण्यासाठी 55 हजार रुपये घेतले जातील, असे दरपत्रक प्रसिद्ध केले आहे. खरे तर, जिल्ह्यात सोशल मीडियावर उघडपणे दहशत पसरवण्याचे दरपत्रक प्रसिद्ध करण्याची ही पहिलीच घटना आहे. ज्यामुळे पोलिसांनी या पोस्टच्या आधारे तपास सुरू केला आहे. तो चरथावल पोलीस स्टेशन परिसरातील चौकाडा गावचा रहिवासी असल्याचे आढळून आले आहे. सीओ सदर कुलदीप कुमार म्हणाले की, इंटरनेटवर हातात पिस्तुल घेऊन दहशत पसरवणारी पोस्ट केल्याचे समोर आले, या प्रकरणाचा तपास केला जात असून लवकरच यात तरुणावर कारवाई केली जाईल, फोटोमध्ये दिसणारा तरूण पीआरडी जवानचा मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे, याचीही चौकशी सुरू आहे.