कोचिंग क्लासला येणार्‍या प्रत्येक विद्यार्थीनीचं केलं ‘लैंगिक’ शोषण, मग ‘पापी प्रोफेसर’ला पाठवलं ‘तिथं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी प्रोफेसर डॉ. शीतल प्रसाद याच्या रासलीला मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. हि घटना समोर आल्यानंतर या प्रोफेसरला अटक करण्यात आल्यानंतर आता अनेक पीडित मुली समोर येत आहेत. त्याचबरोबर समाजातून देखील त्याला कडक शिक्षा होण्याची मागणी समोर येत असून या मुलींमुळे त्याच्या पापी कृत्यांचा पर्दाफाश झाला आहे.

मुजफ्फरपुरमधील हा पापी प्रोफेसर शीतल प्रसाद याच्या कृत्यांचा पर्दापाश झाल्यानंतर या पापांना समोर आणणाऱ्या मुली देखील समोर आल्या आहेत. या मुली मुजफ्फरपुर येथे पत्रकारिता शिकत असून पीडित मुली या मुलींच्या मैत्रिणी आहेत. त्यांनी अनेक धक्कादायक गोष्टी देखील सांगितल्या आहेत. हा नराधम प्रोफेसर प्रत्येक मुलीला आपल्या कृत्याची शिकार बनवत असे. काही मुली त्याला वैतागून शिक्षण सोडून देत असता मात्र काहीजणी हा त्रास सहन करत असतं.

मात्र आता त्याची पापे समोर आल्यानंतर त्याला कडक शिक्षा देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या मुलींच्या शौर्याची कहाणी समोर आल्यानंतर शिक्षकांनी त्यांचा सत्कार करत त्यांचे कौतुक केले. तर पोलिसांनी देखील आरोपीला कडक शिक्षा करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like