MvAct 2019 : ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये मोठे बदल, आता केवळ ‘एवढया’ वर्षासाठीच वैध राहणार ‘DL’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर आता सरकार वाहन चालक परवान्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल केला आहे. यापुढे खासगी, व्यावसायिक आणि ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या गाड्यांच्या चालकांसाठी नवीन नियमांनुसार वाहन परवाना दिला जाणार आहे. सारथी ऍपमध्ये यासंदर्भात मोठ्या प्रमाणत बदल करण्यात आले आहेत. जुन्या नियमांमध्ये जर कुणी 18 व्या वर्षी वाहन परवाना काढला तर त्याला 20 वर्षापर्यंत किंवा वयाच्या 50 व्या वर्षांपर्यंत तो परवाना चालत असे.

मात्र आता केंद्र सरकारने नवीन नियम लागू केला आहे. यामध्ये 30 वर्षांच्या आतील कोणताही व्यक्ती वाहन परवाना काढत आले तर त्याला वयाच्या केवळ 40 व्या वर्षांपर्यंतच तो वापरता येणार आहे. त्यानंतर मात्र त्याला परवान्याच्या नूतनीकरण करावे लागणार आहे. 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीने परवाना काढल्यास त्याचा कालावधी आता केवळ 5 वर्षांचा असणार आहे. त्यानंतर त्याला पुन्हा नूतनीकरण करावे लागणार आहे.

व्यावसायिक वाहनांचा अवधी 5 वर्ष –

व्यावसायिक वाहनांच्या परवान्यांचा अवधी आधी केवळ 3 वर्षांचा होता. मात्र नवीन कायद्यामध्ये तो 5 वर्षांचा करण्यात आला आहे. त्यानंतर मात्र पुन्हा त्याचे नूतनीकरण करावे लागणार आहे.

त्याचबरोबर ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांच्या चालकाला देखील आधी एक वर्षांचाच कालावधी मिळत असे, मात्र आता त्यांना 3 वर्षांचा कालावधी मिळणार आहे.

Visit – policenama.com