MVA Govt Minister On Aurangabad Naming Issue | ‘औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही’; ‘महाविकास’ मधील मंत्र्यानं स्पष्टच सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MVA Govt Minister On Aurangabad Naming Issue | गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादचं (Aurangabad) संभाजीनगर (Sambhajinagar) नामकरणावरून राज्यात वाद निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) सत्ता स्थापन झाल्यापासून आता भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी औरंगाबादचं संभाजीनगर नामांतरावरुन मोठं विधान केलं आहे. ‘संभाजीनगरचा विषय महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही,’ असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

 

”औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही. हे त्या – त्या पक्षाचे अजेंडे असतात. माझं व्यक्तिगत मत देणं योग्य नाही. हा सरकारच्या अजेंड्यावर विषय नाही, आमच्या पक्षाच्या तर आजिबातच नाही. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे लोक संभाजीनगर म्हणतात. त्यात त्यांना नक्कीच आनंद वाटतो,” असं राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (MVA Govt Minister On Aurangabad Naming Issue)

 

पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले, ”गरजेप्रमाणे आणि सोयीप्रमाणं संभाजीनगर लोक म्हणतात.
पण मला वाटत नाही की हा आज लगेच अजेंड्यावरचा विषय आहे. आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत.
पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचे, वीजेचे आणि अन्य प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या सोडवणुकीकडे आपण लक्ष देऊ,” असंही ते म्हणाले.

 

संभाजीनगर नामकरणावर फडणवीस – उद्धव ठाकरे कलगीतुरा –

”औरंगाबादला संभाजीनगर म्हणतोय आणि ते आहेच. संभाजीनगर नामांतर करायची गरज काय ? आहेच ते संभाजीनगर.
नामांतर करायची गरजच काय आहे.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी 14 तारखेला मुंबईत झालेल्या सभेत म्हटलं होतं.
त्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या जाहीर सभेत पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेवर हल्ला चढवला होता.
फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना ”ओ खैरे व्हा आता भैरे, औरंगाबादचा कायमचा झाला कसरा आणि भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा,” असा टोला लगावला होता.

 

Advt.

Web Title :- MVA Govt Minister On Aurangabad Naming Issue | Maharashtra health minister rajesh tope on aurangabad naming issue as a sambhajinagar shiv sena maha vikas aghadi ncp bjp

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा