MVA Mahamorcha | शरद पवारांचा इशारा, म्हणाले-‘राज्यपालांची हकालपट्टी करा, अन्यथा…’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MVA Mahamorcha | महाविकास आघाडीच्यावतीने (Mahavikas Aghadi) महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल (Governor Bhagatsingh Koshyari) आणि भाजप (BJP) नेत्यांविरोधात आज मुंबईत मोर्चा (MVA Mahamorcha) काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी राज्यपाल आणि भाजपवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील महापुरुषांचे नाव आणि त्यांच्या कार्याचे देशभरात आदराने स्मरण केले जाते. परंतु याच महापुरुषांबाबत राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करा अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा शरद पवार यांनी दिला. तसेच महापुरुषांबद्दल गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांना धडा शिकवावाच लागणार असल्याचे ते म्हणले.

ते पुढे म्हणाले, आपण आज महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एकत्र आलो होते. ज्यांच्या हातात सत्तेची चावी आहे. महाराष्ट्राचा महापुरुषांबाबत चुकीची भाषा वापरत आहेत. शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचं नाव आज साडे तीनशे वर्षे झाले तरी अखंड आहे. त्यांच्या नावाचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. त्यामुळे आज लाखोंच्या संख्येने मोर्चा (MVA Mahamorcha) एकत्र आला आहे. जर माफी मागितली गेली नाही तर हा तरुण शांत बसणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

 

शरद पवार पुढे म्हणाले, आजचे राज्यकर्ते महापुरुषांचा अपमान करतात मला विधान भवनात जाऊन 55 वर्षे झाली अनेक राज्यपाल मी पाहिले. तत्कालीन राज्यपालांनी महाराष्ट्राच नाव लौकिक वाढवण्याचे काम केले.
परंतु हे राज्यपाल सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांच बिहार उत्तर प्रदेश, दक्षिणेत आदराने नाव घेतले
जाते आणि अशा महापुरुषांबाबत राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य करतात.
त्यामुळे त्यांची हकालपट्टी लवकरात लवकर करा. अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही,
असे शरद पवार म्हणाले.

Web Title :-MVA Mahamorcha | ncp chief sharad pawar demand to central government call back to governor bhagat singh koshyari

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajay-Atul | गाणी रिमिक्स करणाऱ्यांवर अजय – अतुलने व्यक्त केली नाराजी; म्हणाले…

Pune District Mining Crusher Industries Association | पुणे जिल्हा खाण क्रशर उद्योग संघाच्या वतीने बेमुदत संप

Hockey World Cup | हॉकी विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण करताना क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे मोठे विधान, म्हणाले …..