MVA Vajramuth Sabha | हिंमत असेल तर मुंबईत निवडणुका घेऊन दाखवा, मविआच्या ‘वज्रमूठ’ सभेतून जयंत पाटलांचे सरकारला आव्हान

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा (MVA Vajramuth Sabha) आज नागपूरमध्ये होत आहे. या सभेसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना (Uddhav Thackeray’s Shiv Sen), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचे (NCP) दिग्गज नेते नागपूरमध्ये आले आहेत. नागपूरच्या वज्रमूठ सभेत (MVA Vajramuth Sabha) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former CM Prithviraj Chavan), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) उपस्थित होते.

 

जयंत पाटील म्हणाले, विदर्भातील शेतकरी सरकारला विचारत आहेत की, मागच्या दहा महिन्यात तुम्ही काय दिलं. राज्यात सत्तेत आल्यानंतर या सरकारने सर्व कामांना स्थगिती दिली. त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो. त्यानंतर कोर्टाने आदेश दिले की, स्टे उठवावा, परंतु सरकारने अद्यापही त्यावरची स्थगिती उठवली नाही. (MVA Vajramuth Sabha) महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी तरुणांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला गेले. शेजारच्या राज्यातील मालक चिडले तर आपली खूर्ची धोक्यता येईल. यामुळे उद्योग राज्याबाहेर जावू दिले, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

 

राज्यात तरुणांनी 50 खोक्यांवर गाणी तयार केली. मात्र त्या तरुणांना या सरकारने तरुंगात टाकण्याचे काम केले. काम करायचे नाही, केवळ आपल्या विरोधात कोणी बोललं तर त्याला त्रास द्यायचा. यापलिकडे या सरकारने काहीच केलं नाही. तसेच महापुरुषांचा अवमान करण्याचे काम या सरकारने केल्याचे, जयंत पाटील यांनी सांगितले.

 

छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) बदनामी यांनी केली.
त्यामुळे महाराष्ट्र आता वाट पाहत आहे की निवडणुका (Maharashtra Elections) कधी होतात.
या सरकारला धडकी भरली आहे. सरकारमध्ये हिंमत असेल तर मुंबईतील निवडणूक घेऊन दाखवावी असं आव्हान जयंत पाटील यांनी दिले.

 

यावेळी जयंत पाटील यांनी शेर म्हणत विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.
जयंत पाटील म्हणाले, जे सोडून गेले त्यांना उद्धवजी गद्दार म्हणतात.
पण मला उद्धवजींना सांगायचं की, कुछ तो मजबुरिया रही होगी… काही तरी त्यांची अडचण असेल.
त्यांना समजून घ्या. मात्र राज्यातील जनता तुमच्या मागे ठामपणे उभे आहेत.
शिवसैनिक तुमच्या मागे आहे, असंही जयंत पाटील यांनी सांगितले.

 

Web Title :-  MVA Vajramuth Sabha | understand the compulsion of those leaving uddhavji what did jayant patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | राज्यातील सरकार स्थिर…, अजित पवारांच्या विधानावर जयंत पाटील म्हणाले…

MVA Vajramuth Sabha | ‘वज्रमूठ सभे आधीच काँग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर’, ‘या’ दिग्गज नेत्याची दांडी

BARTI Pune | बार्टी संस्थेच्यावतीने विविध उपक्रमांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Maharashtra Political News | अजित पवारांसह ‘या’ दोन नेत्यांची अमित शहांबरोबर बैठक झाली, शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा