MVA vs BJP | ‘भाजप-मविआ’मध्ये आरोपांचे राजकीय शीतयुद्ध; फडणवीस सरकारमधील कथित गैरव्यवहार ‘महाविकास’ सरकार बाहेर काढणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MVA vs BJP | महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून भाजप आणि महाविकास आघाडी सरकार (MVA vs BJP) यांच्यात अनेक किरकोळ अशा कारणामुळे शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. त्यातच भाजपने महाविकास आघाडीमधील नेते आणि मंत्र्यावर गैरव्यवहारांच्या आरोपांचा सुरसपाटाच लावला आहे. यावरुन आता महाविकास आघाडी देखील भाजपवर अनेक आरोप करताना दिसत आहे. तर, भाजपला उत्तर देण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमधील कथित घोटाळे बाहेर काढले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यांनतर मुश्रीफांनी देखील भाजपच्या नेत्यांवर प्रत्यारोप केलेत. त्यामुळे आरोपाला प्रत्यारोप दिल्याने भाजप आणि महाविकास आघाडीमधील रोष पणाला लागला आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी आरोपावरुन सुतोवाच केले आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) बांधकाम मंत्री असताना हायब्रीड एनयूटीचा मोठा घोटाळा झाला. इतरही घोटाळे झाले. आता आम्हालाही त्यांचे घोटाळे बाहेर काढावे लागतील. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना मी हे सांगितले आहे. शांत बसून चालणार नाही. आपल्या सगळ्यांवरच असे आरोप सुरू राहतील. अशावेळी लोकशाही मार्गाने आपल्यालाही आधीची प्रकरणे बाहेर काढावी लागतील, असं मुश्रीफांनी म्हटल्याने राजकीय वातावरण आता जोर धरण्याच्या मार्गावर (MVA vs BJP) लागलं आहे.

भाजपकडून सात्तत्याने होत असलेल्या आरोपावरुन महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील मंत्र्यांनी देखील भाजपवर पलटवार केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत असल्याचं दिसत आहे. भाजपच्या गंभीर आरोपानंतर आता महाविकास आघाडी देखील राजकीय खेळी करण्यास पुढे सरसावली जावू शकते. असे सुतोवाच आघाडीच्या मंत्र्याकडून पाहायला मिळत आहे.

दरम्यान, फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील कथित घोटाळ्यांची चौकशी करण्याचे आदेश जुलै 2021 मध्येच आघाडी सरकारने एसीबीला दिले होते व ती चौकशी सुरू आहे. फडणवीस सरकारच्या काळात सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे वनमंत्री असताना त्यांनी 33 कोटी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली होती. मात्र, त्यात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी असल्याने विधिमंडळ सदस्यांची एक समिती या तक्रारींची चौकशी सध्या करीत आहे.

फडणवीस यांचे निकटवर्तीय मानलेले एक माजी मंत्री सध्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत.
त्यांच्यावर एका आर्थिक गैरव्यवहार कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.
दरम्यान, आणखी एका मोठ्या विषयाचे पुरावे काँग्रेसच्या (Congress) एका ज्येष्ठ नेत्याने तयार ठेवल्याची देखील माहिती आहे.
तर, ‘बदला घेण्याचे राजकारण खेळायचे नाही’ या भूमिकेतून आम्ही शांत होतो,
मात्र, आता विचार करावा लागणार असल्याचं एका जेष्ठ मंत्र्यांनी सांगितल्याचं समजते.

Web Titel :- MVA vs BJP | mva govt strategy expose scams previous ministers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात 130 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Gold Price Today | सोन्याच्या दरात किंचित घट तर चांदी वधारली, जाणून घ्या आजचे दर

Maharashtra Rains | राज्यात ‘धो-धो’ पाऊस ! मुंबई-पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘अलर्ट’