‘त्यांना माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते हेच माझं यश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – “मी ब्राह्मण आहे ना, दुनियेला माहितीये मी ब्राह्मण आहे ते. पवारसाहेब पुरोगामी विचाराचे नेते आहेत. त्यांना माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते हेच माझं यश आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना एका मुलाखतीतही माझ्या जातीची आठवण करून दिली होती. परंतु लोकांनी मला आहे तसं स्विकारलंय”, असं वक्तव्य करत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची मनमोकळी उत्तरं दिली.

‘हे सांगण्याची गरज किमान पवारांना तरी पडली नसती’
फडणवीस म्हणाले, “मला खरंच वाटतंय की महाराष्ट्राच्या राजकारणात मी काहीतरी स्थान मिळवलं आहे. अन्यथा वारंवार आडून आडून मी कोणत्या जातीचा आहे हे सांगण्याची गरज किमान पवारांना तरी पडली नसती. आमच्या विरोधकांची आयुधं ज्याक्षणी संपतात तेव्हा ते जातीवर येतात. मला असं वाटतं की, जात नेत्यांच्या मनात असते जनतेच्या नसते.”

‘उन्माद, गर्व असं काहीही नाही’
तुम्हाला सत्ता आणि पदाचा गर्व किंवा दर्प आहे अशी टीका पवारांनी केली होती यावरून प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, “मी 5 वर्ष जनतेसाठी काम केलं. 5 वर्ष मी घरच्यांना अजिबात वेळ दिला नाही. त्यामुळे उन्माद, गर्व असं काहीही नाही. उलट निवडणुकीचा निकाल पाहता जनादेश भाजपला आहे. त्यांनी तर अनैसर्गिक युती केली आहे. जनेतचं बहुमत मात्र आम्हाला आहे.” असे म्हणत त्यांनी महाविकासआघाडीला टोला लगावला.

Visit : Policenama.com

 

Loading...
You might also like