‘माझा मृत्यू अटळ होता पण सलमान देवासारखा आला’; राखीची आई झाली भावुक

पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस फेम राखी सावंत ला कोण नाही ओळखत! कधी आपल्या मिश्किल व्हिडिओज मुळे, कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे तर हल्ली ती चर्चेत आली होती बिग बॉस मुळे. पण सध्या राखी चर्चेत अली आहे तिच्या आईमुळे. होय, राखीची आई कॅन्सर ने त्रस्त असून त्यांची अवस्था खूप चिंताजनक होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना लवकरात लवकर ऑपरेशन ची गरज होती. या ऑपरेशन मध्ये राखी सावंत च्या आई चा ट्युमर काढण्यात येणार होता पण पैसे नसल्या मुळे हे ऑपरेशन रखडले होते.

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री राखी सावंतने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने उघड केले आहे की तिच्या आईचे ऑपरेशन आज होणार आहे. व्हिडिओ पोस्ट करताना राखी आणि तिच्या आईने अभिनेता सलमान खानचे आभार मानले.

नंतर राखीची आई असं देखील म्हणाली कि “जेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते तेव्हा मला वाटले की मी आता मारणार आहे… पण देवने सलमानला देवदूत म्हणून पाठवले. अश्या कठीण काळात सलमानने आम्हाला मदत केली … मी त्याचे आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार मानते.”