अबब ! उमेदवारीसाठी ‘या’ मुख्यमंत्र्यांनी घेतले ६ कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार असून दिल्लीत देखील सर्व जागांसाठी उद्या मतदान होत आहे. त्यापूर्वीच एक मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे. तिकीटासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ६ कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आम आदमी पक्षाचे पश्चिम दिल्लीतील उमेदवार बलबीर सिंह जाखड यांचा मुलगा उदय जाखड यांनी केला आहे.

याबाबतचा ठोस पुरावा असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. तीन महिन्यांपूर्वी आपल्या वडिलांनी राजकारणात प्रवेश केला असून, त्यांच्याकडून तिकिटासाठी सहा कोटी रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे . याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांना (बलबीर) मी शिक्षणासाठी पैसे मागितले होते. मात्र त्यांनी त्यासाठी पैसे दिले नाहीत. त्यांनी हा पैसे निवडणुकीसाठी वापरण्याचा विचा केला.

दरम्यान, मतदानापूर्वी केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने ‘आप’ला धक्का बसला आहे.आता केजरीवाल यावर काय उत्तर देतात हे प;वाहने महत्वाचे ठरणार आहे .