आपल्या आडनावावरून अमिताभ यांचा गौप्यस्फोट

कोची वृत्तासंस्था – कोची येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जाहिरात संघाच्या कार्यक्रमात बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी असे म्हटलं की , जात लपण्यासाठी माझ्या वडिलांनी म्हणजे हरिवंशराय बच्चन यांनी बच्चन हे आडनान स्वीकारलं.श्रीवास्तव हे आमचे पुर्वीचे आडनाव होते. पुर्वीपासून आपल्या देशात आडनावावरुन जात किंवा धर्म ओखळण्याची प्रथा आहे.जात,धर्म यावर माझ्या वडिलांचा विश्वास नव्हता.आपल्या देशातील समाजात ही प्रथा बंद झाली पाहिजे, म्हणून त्यांनी ‘श्रीवास्तव’ हे आडनाव बदलून ‘बच्चन’ हे आडनाव त्यांनी स्वीकारले,आणि बच्चन हे या कुटुंबीयांचे आडनाव झाले असेही बिग बी यांनी सांगितले.
समाज हा जाती पातींमध्ये विखुरला गेला आहे. आडनावावरून जात ओळखता येऊ नये म्हणून त्यांनी श्रीवास्ताव हे आडनाव सोडले आणि बच्चन हे आडनाव स्वीकारले. मी त्यांची परंपरा कायम पुढे चालवली आहे. बच्चन या आडनावाचा गर्व आहे,माझे आडनाव बच्चन असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी आजवर व्यासनाधीन उत्पादन्नावरच्या जाहिराती एकदाही केलेल्या नाहीत.मी कायम स्वच्छ भारत अभियान, पोलिओ मुक्ती मोहीम तसेच कॉर्पोरेट जाहिराती केल्या आहेत.
हिंदी सिनेसृष्टीत बिग बी ना पंधरा फेबुवारीला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत.त्यांनी १९६९ साली सिनेमा जगतात पाऊल ठेवले. त्यांना हिंदी चित्रपटात अभिनय करण्याची संधी सात हिंदुस्थानी या सिनेमात मिळाला.या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना पहिले फिल्मफेअर मिळाले. १९७३ मध्ये आलेला जंजीर हा सिनेमा त्यांच्या कारकिर्दीतील मोलाचा दगड ठरला. या सिनेमानंतर त्यांना अँग्री यंग मॅन हे बिरूद लागले. आता त्यांनी सिनेसृष्टीत ५० वर्षे पूर्ण होतानाच बच्चन आडनाव वडिलांनी का स्वीकारलं त्याचं कारण सांगितलं आहे