विद्यापीठाच्या तुलनेत माझ्या प्रयोगशाळेतील संशोधन हे दर्जेदार…

नागपुर : पोलीसनामा ऑनलाईन – देशाचा विकास करताना संशोधनाची भूमिका महत्त्वाची आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून संशोधनाच्या मोठय़ा अपेक्षा होत्या. परंतु दुर्दैवाने येथे संशोधनावर भर दिला गेला नाही. या विद्यापीठाच्या तुलनेत माझ्या प्रयोगशाळेत होणारे संशोधन अधिक दर्जेदार आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज शनिवारी आयोजीत केलेल्या स्मार्ट सिटीवरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत त्यांनी आपले मत व्यक्त केले.

विद्यापीठाने संशोधनावर भर दिला तर विदर्भातील अनेक प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. स्मार्ट सिटीमध्ये शिक्षण,आरोग्य,  वाहतुक यंत्रना,पर्यावरण या बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. पर्यायी इंधन निर्मितीची क्षमता आपल्या देशात असून त्यासाठी योग्य प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण कचऱ्याचे रुपांतरण संपत्तीत करु शकतो पण त्यासाठी योग्य नेतृत्वाची गरज आहे. असे ही गडकरी यावेळी म्हणाले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असलेले पँम कँल्सी म्हणाले की, पर्यावरणावर बोलणारा मी एक छोटा माणुस असून, वातावरणातील बदलामुळे शहराचे नियोजन करणाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते.यासाठी शाश्वत विकास महत्वाचा असून, त्यांनी सौर ऊर्जा,सांडपाणी,प्रदुषण,आदी विषयावर भाष्य केले. विद्यापीठ शिक्षण मंच आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर हिंदी शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘स्मार्ट सिटी’वर शनिवारी आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. गुरूनानक भवन येथे आयोजित या कार्यशाळेच्या उद्घाटन सोहोळ्यात.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॅनडा येथील पर्यावरणतज्ज्ञ पॅम कॅल्सीविद्यापीठ शिक्षण मंचच्या कल्पना पांडेडॉ. प्रमोद शर्माडॉ. संजय दुधे उपस्थित होते. प्रास्ताविक कल्पना पांडे यांनी केले. दक्षिण अफ्रिकाथायलंड आदी देशातील सुमारे एक हजाराहून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत