इंदिरा गांधींप्रमाणे माझीही हत्या होऊ शकते : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची सुरक्षारक्षकानेच हत्या केली होती. त्याप्रमाणेच मला सुरक्षा देणारा पर्सनल सिक्यूरिटी ऑफिसरच (PSO) माझी हत्या करू शकतात. अशा गौप्यस्फोट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझी हत्या घडवून आणू शकतात असा दावा त्यांनी याआधी केला आहे.

पंजाब केसरी या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही भिती व्यक्त केली आहे. माझी सुरक्षा करणारे अधिकारी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार काम करतात. त्यामुळे इंदिरा गांधी यांची ज्याप्रकारे हत्या करण्यात आली होती. त्याप्रमाणेच माझीही हत्या सुरक्षा रक्षक अधिकारीच करू शकतात. माझ्या जीवन मरणात केवळ २ मिनिटाचे अंतर आहे. असे त्यांनी सांगितले.

माझ्या अवती भवती जे सुरक्षा रक्षक आहेत ते सगळे भाजपला रिपोर्ट करतात. भाजप नेते त्यांच्याकरवी माझी हत्या करू शकातत. माझ्या जीवाला त्यांच्याकडून धोका आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.

आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या या दाव्याने आता पुन्हा खळबळ उडाली आहे. नरेंद्र मोदी माझी हत्या घडवून आणू शकतात असा दावा याआधी त्यांनी २०१६ मध्ये केला होता.