आता तुमच्या पाळीव कुत्र्यांचा सुद्धा काढू शकता विमा, Bajaj Allianz कडून पेट डॉग पॉलिसी लाँच

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील नॉन-लाइफ इन्श्युरन्स कंपनी बजाज अलियांझने पाळीव कुत्र्यांसाठी पेट डॉग विमा पॉलिसी सादर केली आहे. ही पॉलिसी दुर्घटना आणि हॉस्पीटलमध्ये दाखलसह अन्य लाभ आणि मृत्यूचा लाभसुद्धा देते.

कंपनीने म्हटले आहे की, कोणत्याही घरगुती पाळीव कुत्र्यासाठी, ज्याचे वय 3 महिन्यापासून 10 वर्ष असेल, विमा खरेदी करता येईल. याचा प्रीमियम 315 रुपये असेल. विमा पॉलिसी खरेदीसाठी कोणत्याही वैद्यकीय तपासणीची गरज नाही.

कंपनीने एका वक्तव्यात म्हटले की, ही विमा पॉलिसी डॉग ब्रीडर किंवा कमर्शियल उपयोगात येणार्‍या कुत्र्यांसाठी खरेदी करता येणार नाही. पॉलिसी जारी होण्याच्या दिवसापासून कोणत्याही दुर्घटनेमुळे झालेली दुखापत/ऑपरेशनचा उपचार किंवा मृत्यू कव्हर करेल. यासाठी ग्राहकाला कोणतीही प्रतिक्षा करावी लागणार नाही आणि त्वरीत दावा निकाली काढण्यात येईल.

बजाज अलियांझ जनरल इन्श्युरन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर तपन सिंघल यांनी म्हटले की, ही पॉलिसी देशी जात, पेडीग्री, नॉन-पेडीग्री, क्रॉस-ब्रीड आणि एक्झोटिक ब्रीड्सच्या कुत्र्यांना व्यापक प्रकारे कव्हर करेल. यामध्ये एक सर्जरी आणि हॉस्पिटॅलायजेशन कव्हर अनिवार्य रूपाने आणि मृत्यू लाभ, टर्मिनल रोग, दीर्घकालीन देखभाल, ओपीडी कव्हर, चोरी/हरवणे आणि थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हरसाठी 6 पर्याय उपलब्ध केले जातील. यापूर्वी डिजिटल केंद्रित जनरल इन्श्युरन्स डिजिट इन्श्युरन्सने जानेवारी 2019 मध्ये अमेरिकन कंपनी वेटिनासोबत मिळून देशात पेट इन्श्युरन्स प्रॉडक्ट लाँच केले होते.