जाणून घ्या UPI व्दारे तुमच्या बँक अकाऊंटमधून एकावेळी किती पैसे करू शकता ‘ट्रान्सफर’, कोणत्या बँकेची किती आहे मर्यादा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने लोकांमध्ये निधी हस्तांतरण वेगवान करण्यासाठी यूपीआय (Unified Payments Interface) विकसित केले आहे. याद्वारे कोणतीही व्यक्ती त्वरित आपल्या बँक खात्यातून दुसर्‍या बँक खात्यात पैसे पाठवू शकते किंवा पैसे मिळवू शकते. यामध्ये, वापरकर्त्याला खात्याची माहिती न देता केवळ यूपीआय आयडी आणि पिनद्वारे पैशाचा व्यवहार करता येईल. यूपीआयमार्फत निधी हस्तांतरित करण्याची कमाल मर्यादा सध्या 1 लाख रुपये आहे. तथापि बँका आणि वित्तीय संस्था त्यांची स्वतःची देय मर्यादा आणि दररोज भरण्याची मर्यादा निश्चित करू शकतात.

कोणती बँक आणि वित्तीय संस्था सर्वाधिक मर्यादा देत आहेत

यूपीआयमार्फत 2 प्रकारच्या मर्यादा निश्चित केल्या आहेत, ज्यामध्ये पहिल्या मर्यादेत आपण एका वेळी जास्तीत जास्त किती रक्कम पाठवू शकता हे निश्चित केले जाते. त्याच वेळी, दुसऱ्या मर्यादेत एका दिवसात व्यवहाराच्या एकूण रकमेची मर्यादा निश्चित केली जाते. जाणून घ्या त्या बँका आणि वित्तीय संस्थांची यादी ज्याद्वारे आपण एकावेळी दुसर्‍या बँक खात्यावर 1 लाख रुपयांपर्यंची रक्कम पाठवू शकता.

1 लाख रुपयांच्या युपीआय व्यवहाराची मर्यादा (दिवसाची मर्यादा 1 लाख रुपये)

– आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक
– एअरटेल पेमेंट बँक
– आंध्र बँक
– अ‍ॅक्सिस बँक
– बँक ऑफ महाराष्ट्र
– सिटी बँक रिटेल
– सिटी युनियन बँक
– देना बँक
– धनलक्ष्मी बँक
– फेडरल बँक
– एचडीएफसी बँक (नवीन ग्राहकांसाठी 5000 रुपये)
– एचएसबीसी बँक
– आयडीएफसी बँक
– इंडियन बँक
– इंडसइंड बँक
– जिओ पेमेंट बँक
– कर्नाटक बँक
– करुर वैश्य बँक
– कोटक महिंद्रा बँक
– ओबीसी बँक
– पेटीएम पेमेंट बँक
– दक्षिण भारतीय बँक
– स्टेट बँक ऑफ इंडिया
– लक्ष्मी विलास बँक
– सारस्वत सहकारी बँक
– युको बँक
– येस बँक

50 हजार रुपयांच्या व्यवहाराची मर्यादा

– आदर्श को-ऑपरेटिव्ह बँक (दिवसाची मर्यादा 50 हजार रुपये)
– कोस्टल लोकल एरिया बँक (दिवसाची मर्यादा 1 लाख रुपये)
– कॉर्पोरेशन बँक (दिवसाची मर्यादा 1 लाख रुपये)
– हिमाचल प्रदेश ग्रामीण बँक (दिवसाची मर्यादा 50 हजार रुपये)
– सर्व हरियाणा ग्रामीण बँक (दिवसाची मर्यादा 1 लाख रुपये)
– गुजरात स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक (दिवसाची मर्यादा 1 लाख रुपये)
– उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (दिवसाची मर्यादा 1 लाख रुपये)

25 हजार रुपयांच्या व्यवहाराची मर्यादा

– अलाहाबाद बँक (दिवसाची मर्यादा 1 लाख रुपये)
– आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक (दिवसाची मर्यादा 1 लाख रुपये)
– बँक ऑफ बडोदा (दिवसाची मर्यादा 1 लाख रुपये)
– भीलवाडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (दिवसाची मर्यादा 25 हजार रुपये)
– सेंट्रल बँक ऑफ इंडिया (दिवसाची मर्यादा 50 हजार रुपये)
– छत्तीसगड राज्य ग्रामीण बँक (दिवसाची मर्यादा 1 लाख रुपये)
– इक्विटास स्मॉल फायनान्स बँक (दिवसाची मर्यादा 1 लाख रुपये)
– आयडीबीआय बँक (दिवसाची मर्यादा 50 हजार रुपये)
– इंडिया पोस्ट पेमेंट बँक (दिवसाची मर्यादा 50 हजार रुपये)
– कर्नाटक विकास ग्रामीण बँक (दिवसाची मर्यादा 25 हजार रुपये)
– कावेरी ग्रामीण बँक (दिवसाची मर्यादा 25 हजार रुपये)
– मध्य बिहार ग्रामीण बँक (दिवसाची मर्यादा 1 लाख रुपये)
– महाराष्ट्र ग्रामीण बँक (दिवसाची मर्यादा 1 लाख रुपये)
– पंजाब नॅशनल बँक (दिवसाची मर्यादा 50 हजार रुपये)
– पूर्वांचल बँक (दिवसाची मर्यादा 1 लाख रुपये)
– तेलंगणा ग्रामीण बँक (दिवसाची मर्यादा 1 लाख रुपये)
– महानगर को-ऑपरेटिव्ह बँक (दिवसाची मर्यादा 50 हजार रुपये)
– रत्नाकर बँक (दिवसाची मर्यादा 25 हजार रुपये)
– युनायटेड बँक ऑफ इंडिया (दिवसाची मर्यादा 60 हजार रुपये)
– विजया बँक (दिवसाची मर्यादा 50 हजार रुपये)

25 हजार रुपयांपेक्षा कमी व्यवहाराची मर्यादा (यूपीआय व्यवहार मर्यादा / यूपीआय दिवसाची मर्यादा)

– अलाहाबाद उत्तर प्रदेश ग्रामीण बँक (20,000/40,000 रुपये)
– आंध्र प्रगती ग्रामीण बँक (10,000/20,000 रुपये)
– आसाम ग्रामीण बँक (5,000/25,000 रुपये)
– बँक ऑफ इंडिया (10,000/1,00,000 रुपये)
– कॅनरा बँक (10,000/25,000 रुपये)
– डीसीबी बँक (5,000/5,000 रुपये)
– जे अँड के ग्रामीण बँक (20,000/20,000 रुपये)
– जम्मू अँड काश्मीर बँक (20,000/20,000 रुपये)
– केरळ ग्रामीण बँक (20,000/20,000 रुपये)
– महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक (5,000/50,000 रुपये)
– पंजाब अँड सिंध बँक (10,000/10,000 रुपये)
– सौराष्ट्र ग्रामीण बँक (20,000/1,00,000 रुपये)
– सिंडिकेट बँक (10,000/1,00,000 रुपये)
– नैनीताल बँक (20,000/40,000 रुपये)
– उत्तराखंड ग्रामीण बँक (25,000/1,00,000 रुपये)