‘या’ पद्धतीनं मोफत आधार कार्ड फ्रेंचाइजी घेऊन करू शकता मोठी कमाई, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – भारतीयांसाठी आधार कार्ड हा महत्त्वपूर्ण ओळखीचा पुरावा आहे. बँक खते उघडण्यापासून ते पासपोर्ट काढ्ण्यापर्यंत अशा अनेक कामांमध्ये आधार कार्डचा वापर केला जातो. केळ आधार कार्ड असून चालत नाही तर आधार कार्डधारकाची माहितीही व्यवस्थित असणे आवश्यक आहे. आधार कार्ड बनवण्यासाठी किंवा त्यातील माहितीची दुरुस्ती करण्यासाठी आधार लागते. या आधार सेंटरला कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा युआयडीएआय सेंटर असेही म्हंटले जाते.

आधार कार्डच्या केंद्राद्वारे करा कमाई
हे आधार केंद्र केवळ लोकांसाठी सेवा देत नाही तर या माध्यमातून रोजगारही उपलब्ध होऊ शकतो. आपण आधार केंद्र सुरु करून चांगली कमाई करू शकतो. मात्र अनेकांना माहित नसते कि हे आधार केंद्र कसे सुरु करायचे. आणि ते मिळवण्यासाठी काय करायचे. हे आधार केंद्र कसे घ्यायचे त्यासाठी कोठे अर्ज करायचा त्याबाबतची सर्व माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. त्यामुळे आपण आधार केंद्र सुरु करून चांगली कामे करू शकता.

कशी घ्याल आधार केंद्राची फ्रेंचाइजी?
आधार केंद्राची फ्रेंचाइजी घेण्यासाठी युआयडीएआयच्या माध्यमातून आयोजित केलेली परीक्षा द्यावी लागते. हि परीक्षा दिल्यानंतर पास होणाऱ्यांना आधार सर्व्हिस सेन्टर खोलण्याचा परवाना दिला जातो. हि परीक्षा प्रमाणपत्रासाठी असते. परीक्षा पास झालेल्या व्यक्तीला आधार एनरॉलमेंट आणि बायोमेट्रिक तपासणी करायची असते. त्यानंतर त्याला हे सेंटर सुरु करता येते.

आधार केंद्रच्या फ्रेंचाइजी रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत
आधारच्या फ्रेंचाइजीसाठी परवाना घेणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला पहिल्यांदा
NSEIT(https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action) या वेबसाईटवर जाऊन पहिल्यांदा Create New User यावर क्लीक करावी यानंतर एक फाईल समोर येईल ती आपल्याला एक कोड शेयर करायला सांगेल. या कोडसाठी https://resident.uidai.gov.in/offline-kyc यावर जाऊन ऑफलाइन ई-आधार डाउनलोड करावे लागेल.

डाउनलोड झाल्यानंतर XML File आणि Share Code हे दोन्ही उपलब्ध होईल
त्यानंतर आपल्यासमोर एक अर्ज दिसेल. यामधील सर्व माहिती भरायची आहे.
आपल्या फोनवर आणि ई-मेल आईडी वर USER ID आणि Password येईल. या आयडी आणि पासवर्डच्याद्वारे Aadhaar Testing and Certification या वेबसाईटवर लॉगिन करू शकतो.

त्यानंतर आपल्या समोर Continue हा पर्याय येईल. त्याच्यावर क्लीक करून पुढे जावे.
पुढच्या टप्प्यात आणखी एक अर्ज येईल त्यामध्ये सांगितलेली पूर्ण माहिती भरायची आहे.
त्यानंतर आपला फोटो आणि डिजिटल सही वेबसाईटवर उपलोड करायची असून सर्व महिती बरोबर आहे कि नाही याची पुन्हा एकदा पडताळणी करून घेऊन Proceed to submit form या पर्ययावर क्लीक करून पुढे जायचे आहे.
त्यानंतर आपल्याला पसे भरायचे आहेत. यासाठी वेबसाईटच्या मेनू मध्ये जाऊन पेमेन्ट या पर्यायावर क्लीक करून पैसे भरायचे आहे त्याचबरोबर Please Click Here to generate receipt यावर क्लीक करून रिसिट घेणे आवश्यक आहे.

सेंटर बुक करण्याची प्रक्रिया
सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर १ ते २ दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर पुन्हा वेबसाईटवर लॉगिन करून Book Center वर क्लीक करून आपल्या नजीक असणाऱ्या सेंटर निवडा. त्यानंतर या संबंधी परीक्षा घेतली जाईल.
आपणाला परीक्षा देण्यासाठी तारीख आणि वेळ सांगावी लागणार आहे. त्यानंतर आपल्याला Admit Card मिळेल. ते डाउनलोड करून प्रिंट काढावी.