लायसन्स आणि वाहनाचे रजिस्ट्रेशन 10 दिवसात करा अपडेट, 1 जानेवारीपासून फाडले जाणार 5000 रुपयांचे चलान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वाहन नोंदणी प्रमाणपत्र समाप्त झाले आहे, तर तुम्हाला त्याच्या नुतनीकरणासाठी लवकरच अर्ज करावा लागेल. कारण कोरोनामुळे परिवहन विभागाद्वारे दिलेली सूट 31 डिसेंबरला समाप्त होत आहे. कोविड-19 महामारी आणि तिच्या प्रसारावर अंकुश लावण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे, अशा वाहन चालकांना सूट दिली होती, ज्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल), नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आणि फिटनेस प्रमाणपत्र यासारखे कागदपत्र मार्च 2020 च्यानंतर एक्सपायर होणार होते.

वरिष्ठ परिवहन अधिकार्‍यांनी सांगितले की, जर रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाकडून पुन्हा एकदा कालवधी वाढवला गेला नाही तर नऊ महिन्यापर्यंत दिलेली सूट 1 जानेवारी 2021 ला समाप्त होत आहे. सुधारित मोटर वाहन (एमव्ही) कायद्यानुसार, वैध लायसन्सशिवाय ड्रायव्हिंग केल्यास 5,000 रुपयांचा दंड लागतो.

असे करा अपडेट ड्रायव्हिंग लायसन्स
डीएल नूतीनकरण अर्ज करण्यासाठी, अर्जदाराने parivahan.gov.in वर जावे, ‘ड्रायव्हिंग लायसन्स-संबंधित सेवा‘ वर क्लिक करा आणि नंतर ‘डीएल सेवा‘ वर क्लिक करा, ज्यानंतर डीएल नंबर टाइप करावा लागेल आणि अन्य माहिती भरावी लागेल. कागदपत्र अपलोड करा आणि जवळच्या आरटीओला जाण्यासाठी स्लॉट बुक करण्यासाठी पैसे भरा. आरटीओमध्ये बायोमेट्रिक माहितीची तपासणी केली जाईल आणि कागदपत्रांची पडताणी केली जाईल, ज्यानंतर एक डीएल जारी केले जाईल. प्रक्रिया आरसी नूतनीकरणासाठी सारखीच आहे.

मोठी आहे वेटिंग लिस्ट
राज्य परिवहन विभागाच्या रेकॉर्डवरून समजते की, रविवारपर्यंत डीएल -पोस्ट ऑनलाइन अर्ज जमा करण्याचे नूतनीकरणासाठी आरटीओमध्ये अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी प्रतीक्षा कालावधी – दोन ते 60 दिवसांपर्यंत होता. केके दहिया, विशेष आयुक्त (परिवहन) यांनी म्हटले, या महिन्यात, डीएल आणि आरसी मिळवण्यासाठी गर्दी वाढली आहे. 13 आरटीओपैकी  प्रत्येक दरदिवशी 200 नूतनीकरण करण्यास सक्षम आहे. याशिवाय, नवीन कागदपत्र प्राप्त करण्याच्या तुलनेत नूतनीकरणाची प्रक्रिया खुप सोपी आहे.